आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सक्लूसिव्ह:अयोध्येत पूजन स्थळावर उपस्थित राहणार 17 लोक, पंतप्रधानांच्या डाव्या बाजूला सरसंघचालक मोहन भागवत बसणार, योगी बसणार समोर

3 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजन स्थळावर किती लोक उपस्थित राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, याची पहिली माहिती भास्करला मिळाली आहे. यानुसार पूजन स्थळावर 17 लोक उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान स्वतः पूजन करणार आहेत. त्यांच्या डाव्या बाजूने आरएसएस प्रमुख मोहन भागवत बसणार आहेत. सीएम योगी आदित्यनाथ समोर बसतील. पाहा पूर्ण लिस्ट

 1. पंतप्रधान मोदी
 2. सरसंघचालक मोहन भागवत
 3. राज्यपाल आनंदीबेन पटेल
 4. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
 5. गोविंद देवगिरीजी
 6. पंडित नारद भटराई
 7. नाव निश्चित नाही
 8. नाव निश्चित नाही
 9. श्रीमती सलील सिंघल - यजमान दिल्ली
 10. सलील सिंघल - यकमां दिल्ली
 11. पंडित गंगाधर पाठक
 12. पंडित जयप्रकाश त्रिपाठी
 13. विश्रुताचार्य
 14. चंद्रभानू शर्मा
 15. इंद्रदेव मिश्र
 16. अरुण दीक्षित
 17. दुर्गा गौतम

मोदींसाठी पहिलेच ताट सजवून ठेवले जाणार
पूजन स्थळावर सोशल डिस्टेंसिंगचे पालन केले जाणार आहे. मोदी पूजा करत असतील तेव्हा मंत्र पठन करताना जल शिंपडले जाणार नाही. तसेच कुणीही आरतीच्या जवळ येणार नाही. त्यांच्यासाठी पहिलेच ताट सजवून ठेवण्यात आलेआहे. सर्व पाहुण्यांसाठी कोरोना निगेटिव्ह सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे. निगेटिव्ह रिपोर्ट पाहिल्यानंतरच पाहुण्यांना एंट्री मिळणार आहे.

32 सेंकडचा मुहूर्त
अयोध्येमध्ये राम मंदिरासाठी 32 सेकंदचे अभिजीत मुहूर्तामध्ये मुख्य भूमिपूजन होणार आहे. मान्यता आहे की, या मुहूर्तामध्येच श्री रामाचा जन्म झाला होता. मोदी यादरम्यान 40 किलो चांदीची विट ठेवून मंदिराची पायाभरणी करणार आहेत. याच मुहूर्तात ते नऊ शिलांचे पूजनही करतील.