आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan Will Be Held On August 5 By Prime Minister Narendra Modi

अयोध्या राममंदिर:राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्टला होणार भूमिपूजन, बांधकाम पूर्ण होण्यास तीन वर्षे लागतील

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सुमारे 9 महिन्यांनी अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू होईल

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त अखेर ठरला. 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून 5 ऑगस्ट या तारखेवर सहमती झाल्याची माहिती आहे. मात्र हे भूमिपूजन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार की पंतप्रधान प्रत्यक्ष अयोध्येत जाऊन करणार, यावर अद्याप अंतिम निर्णय बाकी आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सुमारे 9 महिन्यांनी अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू होईल.

या भव्य मंदिरासाठी संत समाज आणि रामभक्तांच्या मागणीवरून बदल करण्यात आले

शनिवारी महंत नृत्यगोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ट्रस्टच्या बैठकीत मंदिराच्या नकाशातील बदलांना मंजुरी देण्यात आली. आता मंदिरात 3 ऐवजी 5 घुमट असतील. उंची 128 फुटांऐवजी 161 फूट असेल. या भव्य मंदिरासाठी संत समाज आणि रामभक्तांच्या मागणीवरून बदल करण्यात आले. बैठकीला मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांच्यासह 12 सदस्य उपस्थित होते.

नव्या मॉडेलमध्ये हे बदल

> मंदिर 128 ऐवजी आता 161 फूट. 

> जुन्या मॉडेलमध्ये तीनच घुमट होते. नव्या मॉडेलमध्ये 5 घुमट. 

> परिक्रमा मार्गावर श्री गणेश, महामाया, सीता, हनुमानांसह 5 देवतांची मंदिरे असतील. 

> जुने मॉडेल 60 टक्के बदलेल. उंचीसह मंदिराची लांबी व रुंदीही वाढेल. खर्चातही प्रारंभीच्या 80 कोटींच्या अंदाजापेक्षा वाढ होईल.

पायाभरणी : पंचरत्न, चांदीचे नाग-नागीण आणि गंगाजल भरलेला तांब्याचा कलश

पायाभरणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या पायात तांब्याचा कलश स्थापित केला जाईल. या कलशात हिरे, मोती, माणिक, सोने आणि पितळ हे पंचरत्न असतील. सोबत चांदीचे नाग-नागीण, हरळी आणि गंगाजल असेल. कलश स्थापनेनंतर नंदा, भद्रा, जया, रिक्ता आणि पूर्णा नामक पाच विटांची पूजा होईल. पंतप्रधानांच्या हस्ते विधिवत पूजा झाल्यावर या भव्य अशा राममंदिराची पायाभरणी केली जाईल आणि बांधकाम सुरू होईल.

बांधकाम पूर्ण होण्यास तीन वर्षे लागतील

टस्टचे महासचिव चंपत राय यांच्यानुसार, बांधकाम सुरू झाल्यानंतर 3 वर्षांत मंदिर पूर्ण होईल. कोरोना संकट सरल्यावर 10 कोटी कुटुंबांकडून दान स्वरूपात रक्कम घेतली जाईल. लार्सन अँड टुब्रो मंदिर उभारेल. सध्या मातीच्या नमुन्यांची तपासणी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...