आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता रामलल्लाचे दर्शन सहजपणे हाेते, परंतु आता पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी यावे आणि भूमिपूजन करून भव्य मंदिराच्या निर्माणकार्याचा आरंभ करावा, अशी आमची इच्छा आहे. वासुदेव घाटावरील रमेंद्र माेहन मिश्र यांच्याप्रमाणेच अयाेध्येतील प्रत्येकाच्या ताेंडी हीच गाेष्ट आहे. सहा जुलैपासून सुरू हाेणाऱ्या श्रावणात भूमिपूजन हाेणार नसल्याने भूमिपूजन कधी हाेणार ? याचीच सर्वांना उत्सुकता आहे. २८ जून राेजी याेगी आदित्यनाथदेखील अयाेध्येत आले व त्यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टसंबंधी पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली हाेती. त्याच्या दुसऱ्या दिवशी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगाेपाल दास यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पत्र पाठवून तत्काळ भूमिपूजन करण्याचा आग्रह केला.
मंदिर निर्माण संबंधात महंत नृत्यगाेपाल दास म्हणाले, त्यासाठी सर्व तयारी आहे. लवकरच निर्माण सुरू हाेईल. भूमिपूजन श्रावणातही केले जाऊ शकते, असे नृत्यगाेपालदास यांचे उत्तराधिकारी कमल नयन दास यांनी सांगितले. श्रावणात सुरू झालेले कार्य पूर्ण हाेते. मंदिर जुन्या माॅडेलनुसार हाेणार आहे. २०२२ ची रामनवमीच्या दिवशी भगवान स्थायी गर्भगृहात विराजमान असावेत, अशी आमची इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले. अयाेध्येतील राजपरिवाराचे प्रमुख व ट्रस्टचे सदस्य बिमलेंद्र माेहन प्रताप मिश्र म्हणाले, भगवान टेंटमधून अस्थायी मंदिरात आले आहेत ही आमच्यासाठी माेठी गाेष्ट आहे. ६७.७ एकर जमिनीवर एक माेठ्या भागात तर अनेक वर्षांपासून काेणी गेलेलेदेखील नाही. त्यालाही नेटके करावे लागणार आहे. रामजन्मभूमीवर गर्भगृहाचे नियाेजित ठिकाणाचे सपाटीकरण झाले. जन्मभूमीपासून तीन किलाेमीटर अंतरावरील श्रीराम जन्मभूमी न्यास कार्यशाळेत दशकांपासून नक्षीकाम व तासलेल्या शिळांच्या साफसफाईचे काम वेगाने केले जात आहे. सध्या श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे कार्य संचलनाचे मुख्य ठिकाण राम कचेरी येथील कॅम्प कार्यालयातून पाहिले जाते. ट्रस्टचे सरचिटणीस व मंदिरा निर्माणात महत्त्वाची भूमिका निभावणारे चंपत राय म्हणाले, संपूर्ण ६७ एकर जमिन ट्रस्टला साेपवण्यात आली आहे. त्यानंतर मार्चमध्ये १२.६० काेटी रुपयांची एफडीदेखील ट्रस्टच्या नावे आहे.
गर्भगृहाची जमिनीवर सपाटीकरणाच्या काम करताना शिवलिंग तसेच नक्षीदार खांब आढळून आले. दरम्यान, मंदिर १४० फूट रुंद, २६८.५ फूट लांब, १२८ फूट उंच असेल. श्रीराम जन्मभूमी न्याय कार्यशाळेत ६ लाेक शिळांची सफाईचे काम करत आहेत. कार्यशाळेचे सुपरवायझर अन्नुभाई साेमपुरा म्हणाले, तीन ते चार महिन्यांत शिळांची सफाई पूर्ण हाेईल. सध्या पहिल्या मजल्यासाठी शिळांची रचना करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिराच्या उभारणीसाठी पाच वर्षांचा कालावधी लागू शकताे. एक ते दीड वर्ष तर कार्यशाळेतून शिळा पाेहाेचवणे व पायाभरणीच्या कामासाठी लागू शकताे. २०२२ मध्ये एक मजला उभा राहू शकताे. रामलल्लाचे पुजारी प्रेम त्रिपाठी म्हणाले, लाॅकडाऊनदरम्यान दाेन-चार लाेकच येत हाेते. परंतु ८ जूननंतर संख्येत वाढ झाली. आता दिवसभरात एक हजारावर भाविक दर्शनासाठी येत आहेत. सायंकाळी शेजाऱ्यांकडून येणारे रामजन्मभूमी-बाबरी प्रकरणातील मुख्य पक्षकार इक्बाल अन्सारी म्हणाले, आता नवा वाद हाेऊ नये एवढेच वाटते.
राैनाहीमध्ये शाळा बांधण्याची इच्छा, संशोधन केंद्राचा विचार
अयाेध्येपासून २५ किमीवरील राैनाही-धन्नीपूर शांतता आहे. येथे महामार्गाजवळील २५ एकर जमिनीवर सरकारी कृषी फार्म आहे. याच फार्ममध्ये पाच एकर जमिनीवर मशिदीची उभारणी केली जाणार आहे. सुन्नी वक्फ बाेर्डाकडे ती साेपण्यात आली धन्नीपूर गावाचे सर्फराज म्हणाले, राैनाहीमध्ये १३-१४ मशिदी आहेत. धन्नीपूरमध्येही दाेन-तीन मशिदी आहेत. त्याएेवजी मुलींसाठी महाविद्यालय, शाळा इत्यादी करणे चांगले हाेईल. सुन्नी वक्फ बाेर्डाचे सीईआे सय्यद माेहंमद शाेएब म्हणाले, काय करायचे तो निर्णय बाेर्ड घेईल. तूर्त तरी छाेटी मशीद बनवण्याचा विचार आहे. इंडाे-इस्लामिक रिसर्च कल्चर सेंटर बनवण्याचाही विचार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.