आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन झाले, पुढे काय?:नकाशा मंजुरीनंतर 10-12 दिवसांनी पायाचे खोदकाम, मंदिर पूर्ण हाेण्यास किमान 3 वर्षे तरी लागतील

विजय उपाध्याय | अयोध्याएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राम मंदिराचा नकाशा मंजूर झाल्यानंतर १०-१२ दिवसांनी मंदिराचे काम सुरू होईल. सूत्रांनुसार, यासाठी २ दिवसांत अयोध्या विकास प्राधिकरणाकडे अर्ज जाईल. मंजुरीसाठी आठवडा लागू शकतो. ट्रस्ट मंदिर उभारणीसाठी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम सुरू करेल. यात पायाचे खोदकाम, भरणी यासह शिळांवर नक्षीकाम वेग घेईल. पाया खोदण्यासाठी ६ एकर जमिनीवर आखणी केली जाईल. मंदिराचा विशाल आकार पाहता पाया खोल असेल. यासाठी रिंग मशीनचा वापर होईल. माती परीक्षणानुसार, पायाची खोली १६० फूट असेल. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनुसार, एका महिन्यात पायाचे खोदकाम पूर्ण होईल. यानंतर लोखंडी जाळी व काँक्रीटने पाया भरला जाईल. यासाठी ३-४ महिने लागतील. यानंतर मंदिराच्या वरील भागाचे काम सुरू होईल. अंदाजानुसार मंदिर पूर्ण हाेण्यास किमान ३ वर्षे तरी लागतील.

बातम्या आणखी आहेत...