आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ayodhya Ram Mandir Land Scam Case Update; Champat Rai | Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra Champat Rai On Land Purchase Allegation; News And Live Updates

ट्रस्टचे घोटाळ्यावर स्पष्टीकरण:चंपत रॉय म्हणाले - घोटाळ्याचे आरोप हे राजकीय षडयंत्र; या कारणांमुळे 2 कोटींची जमीन 18.5 कोटी रुपयांत खरेदी केली - ट्रस्ट

अयोध्या2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातील जमिनीची ट्रस्टकडून खरेदी

राम मंदिर जमीन घोटाळ्याच्या आरोपावरुन ट्रस्टचे सरचिटणीस चंपत रॉय यांनी पलटवार केला आहे. जमिनीच्या खरेदीवरुन करण्यात येणार आरोप राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचे रॉय म्हणाले. मंदिरासाठी खरेदी करण्यात येणारी जमीन बाजार भावाच्या तुलनेत कमी दरात खरेदी करण्यात येत असल्याचे रॉय यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आतापर्यंत मंदिरासाठी खर्च करण्यात आलेल्या प्रत्येक पैशाचा हिशोब रेकॉर्डमध्ये आहे.

या कारणांमुळे 2 कोटींची जमीन 18.5 कोटी रुपयांत मिळाली
ट्रस्टचे म्हणणे आहे की, सुलतान अन्सारी आणि रवि मोहन तिवारी यांनी सुमारे 10 वर्षांपूर्वी कुसुम पाठक आणि हरीश पाठक यांच्याकडून बाग बिजेरची जमीन खरेदी केली होती. त्यानुसार त्याचा दर दोन कोटी रुपयांत निश्चित करण्यात आला होता व याची नोंददेखील करण्यात आली होती. ज्यावेळी मंदिराने ही जमीन विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा सुल्तान अन्सारी आणि रवि मोहन तिवारी यांनी पाठक कुटुंबिंयाकडून 18 मार्च 2021 रोजीच्या बाजार भावाने दर निश्चित केले व आजच्या दरानुसार ते मंदिर ट्रस्टला विकले. त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नसून फक्त रामभक्तांना दिशाभूल करण्यासाठी हे राजकीय षडयंत्र असल्याचे रॉय म्हणाले.

मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातील जमिनीची ट्रस्टकडून खरेदी

  • राम मंदिर ट्रस्टला केंद्र सरकारकडून 70 एकर जमीन मिळाली आहे.
  • ट्रस्टने मंदिर विस्ताराची योजना आखली असून यासाठी 108 एकर जमिन लागणार आहे. यापूर्वी मंदिर संकुल 3 एकरात होते ते आता 5 एकरात बांधले जाईल.
  • मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातील सुमारे 70 एकर जमीन खरेदी केली जात आहे.
  • अलीकडेच ट्रस्टने जवळ पासची दोन मंदिरे 4-4 कोटींमध्येही खरेदी केली आहेत.
  • ज्या लोकांकडून या जमिनी घेतल्या जात आहेत, त्या लोकांनाही इतरत्र जागा देण्यात येत आहे.
  • कोर्टाचे शुल्क आणि मुद्रांक कागदांची खरेदी ऑनलाइन केली जात आहे.