आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ayodhya Ram Mandir | Meeting Of Sri Ram Janmabhoomi Shrine Area Today, The Date For The Ram Temple Foundation Stone May Be Announced

अयोध्या राममंदिर:5 ऑगस्टपासून मंदिराचे बांधकाम सुरू होण्याची चर्चा; श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या बैठकीत आज होऊ शकतो निर्णय

अयोध्या3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी अयोध्येत मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी ट्रस्टच्या सदस्यांसमवेत शनिवारी होणाऱ्या बैठकीच्या अजेंड्यावर चर्चा केली.
  • पंतप्रधान मोदींच्या अयोध्येतील संभाव्य कार्यक्रमावरही बैठकीत विचार केला जाऊ शकतो

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची आज दुपारी तीन वाजेपासून अयोध्येत बैठक होणार आहे. या बैठकीत मंदिराच्या पायाभरणीची तारीख जाहीर केली जाऊ शकते. 5 ऑगस्टपासून मंदिराचे बांधकाम सुरू होऊ शकते, असे सांगितले जात आहे. दरम्यान पंतप्रधान कार्यालयाकडून याची पुष्टी झाली नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अयोध्येतल्या संभाव्य कार्यक्रमावरही बैठकीत चर्चा होऊ शकते.  ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी पंतप्रधानांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण पत्र पाठवले आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ट्रस्टचे सदस्यही अयोध्येत दाखल झाले आहेत.

3 किंवा 5 ऑगस्टच्या कार्यक्रमास सहमती दिली जाऊ शकते

मणिराम छावणी मठाचे महंत कामंत नयन दास म्हणाले, लवकरच मंदिराचे बांधकाम सुरू होईल. पंतप्रधानांनी लवकरच येथे येऊन बांधकाम सुरू करावे अशी संतांची मागणी आहे. ते आधीच येणार होते पण कोरोना संकटामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलला गेला. आता पंतप्रधान 3 किंवा 5 ऑगस्टला येथे येऊ शकतात. परंतु अंतिम तारीख निश्चित होणे बाकी आहे.