आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ayodhya Ram Mandir | Modi Will Arrive In Ayodhya On August 5 To Lay The Foundation Stone Of Ram Temple Construction, PMO Decides Schedule

अयोध्या राममंदिर:पायाभरणीचा मुहूर्त ठरला, 5 ऑगस्टला बांधकाम सुरू; साडे-पाच एकरातील श्रीराम मंदिराला असतील 5 कळस

विजय उपाध्याय | अयोध्या2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदींनी निमंत्रण स्वीकारले, सकाळी 8 वाजता सुरू होणार भूमिपूजनाचे धार्मिक विधी
  • ट्रस्ट अध्यक्ष देणार 40 किलो चांदीची शिळा

अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी ५ ऑगस्टपासून सुरू होईल. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे निमंत्रण स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी याच दिवशी भूमिपूजनासाठी येतील. याशिवाय, सरसंघचालक मोहन भागवत, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह २०० मान्यवरांची उपस्थिती असेल. पूजन तसेच मंत्रोच्चारासाठी पंतप्रधान मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीहून पुजारी येतील. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास मंदिरासाठी ४० किलो वजनाची चांदीची श्रीराम शिळा सोपवतील. या शिळेची पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्थापना होईल. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेने या भूमिपूजन व पायाभरणी समारंभाचे दूरचित्रवाणीवर थेट प्रक्षेपण केले जावे, अशी मागणी करून म्हटले आहे की, आज कोट्यवधी लोकांची इच्छा पूर्ण होत आहे. याचे साक्षीदार होण्याचा प्रत्येक हिंदूचा अधिकार आहे.

शहा यांनी ज्या गगनचुंबी मंदिराची घोषणा केली त्याची रचना ६ महिन्यांनी समोर आली. अयोध्येत पाच कळस आणि मंडप असलेल्या नव्या स्वरूपातील मंदिर ५.५ एकरात उभे राहील. मंदिर कसे असेल याबाबत झारखंड विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी उल्लेख केला होता.

मंदिराचे गर्भगृह असेल जमिनीपासून १९ फूट उंच

या मंदिराचे गर्भगृह जमिनीपासून १९ फूट उंच असेल. जमिनीच्या पातळीच्या वर प्रथम व द्वितीय असे टप्पे असतील. पाच कळसांच्या या मंदिराच्या समोर दिशेनुसार पंचदेव विराजमान असतील. मंदिराच्या या स्वरूपाची तयारी सहा महिन्यांपासून सुरू होती. ट्रस्टच्या सूत्रांनुसार, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मंदिर अधिक भव्यदिव्य असावे म्हणून त्याच्या नव्या रचनेवर काम सुरू होते. याची जबाबदारी चंद्रकांत सोमपुरा यांच्यावर सोपवण्यात आली होती. ट्रस्टकडे ६७.७ एकर जमीन आहे. मंदिरासाठी यातील ५.५ एकर वापरली जाईल. उर्वरित ६२.२ एकर भाविकांच्या सुविधांसाठी तसेच प्रसादालयासाठी वापरली जाईल. तशी सविस्तर प्रतिकृती ट्रस्टने तयार करून ठेवली आहे.

अयोध्येत जय्यत तयारी, पोलिस बंदोबस्तही

पंतप्रधान नरंेद्र मोदी यांच्या या नियोजित अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने अयोध्या व परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. पूर्वी अयोध्येत कायम बंदोबस्त असे. परंतु, तो वादग्रस्त जागेच्या संरक्षणासाठी असायचा. आता मंदिर बांधकामासाठी हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सकाळी ११ ते ३ पर्यंत मोदी अयोध्येत

सूत्रांनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑगस्टला सकाळी ११ वाजेपासून दुपारी साधारण ३ वाजेपर्यंत अयोध्येत थांबतील. मंदिराची पायाभरणी व भूमिपूजनाचे धार्मिक विधी सकाळी ८ वाजता सुरू होतील. भूमिपूजन झाल्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते येथे कोनशिला उभारली जाईल. रामजन्मभूमी ट्रस्टची शनिवारी बैठक झाली होती. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवून त्यात ३ किंवा ५ ऑगस्ट अशा दोन तारखा देण्यात आल्या होत्या. तत्पूर्वी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांनी पंतप्रधानांना अयोध्येचे निमंत्रण पत्राद्वारे पाठवलेच होते. याचा स्वीकार करत पंतप्रधान कार्यालयाने ५ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली. त्यानुसार नियोजित कार्यक्रम पार पडतील.

मंदिरात विहिंपने कोरून ठेवलेल्या शिळांचा वापर

ट्रस्टच्या एका सदस्याने सांगितले की, विहिंपने मंदिराच्या मूळ मॉडेलचा विस्तार केला आहे. शिवाय विहिंपच्या न्यासाने मध्यंतरीच्या काळात कोरून ठेवलेल्या शिळांचाच मंदिर बांधकामात वापर होईल. मंदिरासाठी राजस्थानातून शिळा आणल्या जातील. मंदिर परिसरातच त्यावर कोरीव काम केले जाईल. कोर्टाच्या आदेशानुसार ट्रस्टला मिळालेल्या जमिनीपेक्षा अधिक क्षेत्राची गरज पडली तर उत्तर प्रदेश सरकार आणखी जमीन अधिगृहीत करून ट्रस्टकडे सोपवू शकते.

बातम्या आणखी आहेत...