आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ayodhya Ram Mandir Nirman | Shri Janmabhoomi Tirtha Kshetra Trust Meeting Today Over Ram Mandir Construction And Management

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राम मंदिर निर्माण:मंदिराच्या बांधकामात लोखंडाऐवजी तांब्याच्या पट्ट्या वापरणार, 36 ते 40 महीन्यात मंदिर तयार होईल

अयोध्या5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंदिर निर्माणात वापरल्या जाणाऱ्या मोठ्या शिळांना जोडण्यासाठी तांब्याच्या पट्ट्यांचा वापर केला जाईल

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामात लोखंडाचा वापर न करण्याचा निर्णय मंदिर ट्रस्टने घेतला आहे. आज दिल्लीत मंदिर ट्रस्टची एक महत्वाची बैठक पार पडली. यानंतर बैठकीत ठरलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे.

यादरम्यान सांगितले की, "मंदिर निर्माणाचे कार्य सुरू झाले आहे. 36-40 महीन्यात मंदिराचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. इंजीनिअर्स साइटवरील मातीचे परीक्षण करत आहेत. तसेच, मंदिराच्या बांधकामात लोखंडाचा वापर केला जाणार नाही. लोखंडाऐवजी तांब्याच्या पट्ट्या वापरल्या जातील.''

मंदिर निर्माणाशी संबंधित महत्वाच्या बाबी

1. भूकंप आणि वादळापासून बचाव करण्यासाठी पारंपारिक तंत्राचा वापर केला जाईल.

2. दगडांना जोडण्यासाठी तांब्याच्या 1 हजार पट्ट्या वापरल्या जातील.

3. तांब्याच्या पट्ट्या दान करणारे, त्यावर आपले नाव लिहू शकतील.

4. मंदिर निर्माणात लोखंडाचा वापर होणार नाही.

5. 36-40 महीन्यात मंदिराचे काम पूर्ण होण्याची आशा आहे.

ट्रस्टने तांब्याच्या पट्ट्या दान करण्याची अपील केली

ट्रस्टचे म्हणणे आहे की देशातील पुरातन आणि पारंपारिक तंत्रे मंदिर बांधकामात वापरली जातील. जेणेकरून भूकंप, वादळ आणि इतर आपत्तींपासून मंदिराला कोणतेही नुकसान होणार नाही. बांधकामात वापरल्या जाणार्‍या दगडांना जोडण्यासाठी तांब्याच्या पट्ट्यांचा वापर केला जाईल. यासाठी 18 इंच लांब, 3 मिलीमीटर जाड आणि 30 मिलीमीटर रुंदीच्या 10 हजार पट्ट्यांचा वापर केला जाईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser