आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ayodhya Ram Mandir | PM Modi Will Have Only 32 Seconds To Lay The Foundation Stone Of Ram Temple

अयोध्या:राम मंदिराच्या पायाभरणीसाठी पीएम मोदींकडे असतील केवळ 32 सेकंद, हा अभिजित मुहूर्त म्हणजे उत्तर-दक्षिणेचा संगम

विजय उपाध्याय | लखनऊ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रस्तावित राम मंदिराचे नवे 3-डी छायाचित्र.
  • 500 वर्षांनी उभारल्या जाणाऱ्या मंदिराच्या पायाभरणीचा विधी विद्वानांच्या हस्ते होईल

प्रभू श्रीराम मंदिराच्या पायाभरणीच्या विधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे अवघे ३२ सेकंद असतील. अभिजित मुहूर्ताच्या या ३२ सेकंदांमध्ये ५०० वर्षांपासूनचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. हा शुभमुहूर्त भारतीय ज्योतिषशास्त्रात उत्तर दक्षिणेतील संगमातून काढला आहे. उत्तर भारतात ५ ऑगस्टला भाद्रपद तर दक्षिण भारतात श्रावण महिना आहे. ५ ऑगस्टला दुपारी १२ वाजून १५ मिनिटे ही मुहूर्ताची वेळ आहे. हा दुर्मिळ मुहूर्त काशीचे प्रख्यात विद्वान गणेश्वरशास्त्री द्रविड यांनी काढला आहे. पायाभरणीचा विधी अभिजित मुहूर्तावर होण्यासाठी काशी विद्वान परिषदेचे मंत्री प्रा. रामनारायण द्विवेदींसह तीन आचार्यांचे या विधीवर लक्ष असेल. देशातील विविध राज्यांतील वैदिक आचार्य ३ ऑगस्टपासून विधी सुरू करतील. महागणेश पूजनापासून याची सुरुवात होईल. या विधीसाठी निवडक व्यक्तींनाच आमंत्रित केलेले आहे. यात माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी मंत्री मुरली मनोहर जोशी, विनय कटियार, उमा भारतींसह सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. प्रा. द्विवेदी म्हणाले, पहिल्या दिवशी महागणेश पूजनासह पंचांग पूजनही होईल. दुसऱ्या दिवशी ४ ऑगस्टला सूर्यासह नवग्रहांची पूजा होईल. ५ ऑगस्टला वरुण, इंद्र आदी देवांची पूजा केली जाईल. पंतप्रधानांना ३० सेकंदांत पूजेच्या साहित्यास संकल्पासह स्पर्श करत पायाभरणी करावी लागेल. दरम्यान, या शुभमुहूर्तावर काही विद्वानांनी आक्षेप घेतला आहे. प्रा. द्विवेदींनुसार, भारतीय भूमीचा आकार महाकाय आहे. अशा वेळी संपूर्ण देशाचा संदर्भ लक्षात घेऊन मुहूर्त ठरवणे योग्य आहे. काशी विद्वत परिषद देशातील प्रमुख संस्थांपैकी आहे. यामुळे शुभमुहूर्तावर आक्षेप घेणे योग्य नाही.

रामानंदी परंपरेनुसार होईल भूमिपूजन : आचार्य सत्येंद्र दास

राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, ही प्रभू श्रीरामांच्या मंदिराची पूजा आहे. यामुळे हा विधी रामानंदी परंपरेनुसार होईल. नंदा, जया, भद्रा, रिक्ता व पूर्णा या शिळांची पूजा केली जाईल. चार शिळा चारही दिशांना तर एक मध्यभागी ठेवली जाईल. शिळांच्या स्थापनेनंतर यावर सर्व नद्या व समुद्राचे जल अर्पण केले जाईल. सर्व तीर्थक्षेत्रांव्यतिरिक्त गोशाळा आणि अश्वशाळेतील मातीची आणि औषधांची पूजा केली जाईल. पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर तरली असल्याने आणि शेषनाग कासवावर असल्याने चांदीचा शेषनाग आणि कासवाला पंचधातू व पंचरत्ने असणाऱ्या पितळी कलशात स्थापित केले जाईल.