आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ayodhya Ram Mandir | Prime Minister Narendra Modi Address To The Nation After Ram Mandir's Bhumi Pujan

अयोध्या राम मंदिर भूमिपूजन:32 सेकंदांत मिटले शतकांचे अंतर, मंदिर आधुनिक भारताच्या संस्कृतीचे प्रतीक, ते राष्ट्र जोडणारे ठरेल : मोदी

अयोध्याएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंदिर आंदोलनात गाजलेल्या ‘जय श्रीराम’ उद््घोषाऐवजी आता ‘जय सियाराम’चा घोष
  • भारतवर्षाला मर्यादा पालनाची शिकवण, देशाच्या शत्रूला इशारा- भय बिनु होइ न प्रीति

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, अयोध्येतील हे भव्य राम मंदिर भारतीय संस्कृतीचे आधुनिक प्रतीक असेल. मंदिर उभारणीची प्रक्रिया संपूर्ण देशाला जोडणारी ठरेल. मंदिर पूर्ण झाल्यावर केवळ अयोध्येचीच भव्यता वाढेल असे नव्हे, तर या भागाचे अर्थतंत्र बदलेल. भूमिपूजनानंतर पंतप्रधान म्हणाले, काळासोबत चालणे श्रीराम आपल्याला शिकवतात. रामाची रीती-नीती आणि कर्तव्यपालन यांचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले, आपल्याला सर्वांसोबत सर्वांचा विश्वास जिंकून विकास करायचा आहे. भगवान रामांचाही हाच संदेश आहे - आता विलंब नको... पुढे वाटचाल करायची आहे. ज्यांच्या त्याग, बलिदान आणि संघर्षाने हे स्वप्न साकार झाले, ज्यांची तपस्या या मंदिराचा पाया ठरली त्या सर्वांना नमन. आंदोलनातील प्रत्येक जण आशीर्वाद देत आहे. {‘जय श्रीराम’ची घोषणा मंदिर आंदोलनाची ओळख होती. मात्र, भूमिपूजनात ‘जय सियाराम’ ही घोषणा देण्यात आली. मोदींनी अनेकदा सियावर रामचंद्र की जय व जय सियाराम असा जयघोष करवून घेतला.

> पंतप्रधान म्हणाले, कोरोनाच्या या काळात प्रभू रामचंद्रांचा मर्यादेचा मार्ग आज अधिक गरजेचा आहे. तो आहे- ‘दो गज की दूरी, मास्क है जरूरी’.

भाषणातील प्रमुख मुद्दे : भारतवर्षाला मर्यादा पालनाची शिकवण, देशाच्या शत्रूला इशारा- भय बिनु होइ न प्रीति

आधुनिक भारत हा संदेश पुढील पिढ्या जगभर पोहोचवतील

राम मंदिर आपल्या संस्कृतीचे आधुनिक प्रतीक ठरेल. येणाऱ्या पिढ्यांना श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा देईल. श्रीरामांचा संदेश जगभर पोहोचवण्याची जबाबदारी या पिढ्यांची आहे.

इशारा : रामाच्या मार्गावरून भरकटले, विनाशाचे मार्ग उघडले

श्रीरामांची नीती आहे - ‘भय बिनु होइ न प्रीति’. देश जेवढा शक्तिशाली होईल, तेवढी शांतता कायम राहील. हीच रामाची नीती आहे. गांधींच्या रामराज्याचे हेच सूत्र होते.

राम काज : प्रभू रामचंद्राचे काम पार पाडल्याशिवाय मला विश्रांती नाही...

मोदी म्हणाले, राम काजु कीन्हे बिनु मोहि कहां बिश्राम। म्हणजे, रामचंद्राचे काम पार पाडल्याविना मला विश्रांती नाही. रामाची कामे हनुमान करतात. त्यांच्या आशीर्वादानंतरच आज भूमिपूजन झाले

५ ऑगस्ट या दिवसाची भावना अगदी १५ ऑगस्टसारखीच आहे

मोदी म्हणाले, १५ ऑगस्ट अथांग तप व लाखाे बलिदानांचे प्रतीक आहे. तसेच राम मंदिरासाठी अनेक पिढ्यांनी प्रयत्न केले आहेत. आजचा दिवस त्या तप त्याग, संकल्पाचा प्रतीक आहे.

लोकांनी अयोध्येप्रमाणे आपले मन बनवावे : मोहन भागवत

सरसंघचालक भागवत म्हणाले, मंदिराप्रमाणेच लोकांनी आपले मनही अयोध्येप्रमाणे बनवावे. संपूर्ण विश्वासला सुख शांतता देऊ शकेल, असा भारत आपल्याला निर्माण करायचा आहे.

भाजपचे दोन अजेंडे पूर्ण... सरकारने ५ ऑगस्ट २०१९ ला कलम-३७० रद्द केले. यंदाच्या ५ ऑगस्टपासून मंदिर उभारणी सुरू झाली आहे. आता समान नागरी कायद्याची चर्चा सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...