आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ayodhya Ram Mandir Updates : Time Capsule To Be Kept 200 Feet Under Ram Temple Construction Site

रामजन्मभूमीचा इतिहासही सुरक्षित राहणार:मंदिर बांधण्यापूर्वी 200 फूट खोल टाईम कॅप्सूल टाकले जाईल, जेणेकरून भविष्यात पुरावे सुरक्षित राहतील आणि वाद होणार नाही

अयोध्या3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराची पायाभरणी करतील
  • राम मंदिराचा पाया 12-15 फूट दरम्यान असण्याची शक्यता आहे

अयोध्येतील राम मंदिराचा इतिहास हजारो वर्षांपर्यंत राहावा यासाठी मंदिराच्या गर्भगृहात 200 फूट खोल एक टाइम कॅप्सूल ठेवण्यात येणार आहे. यामध्ये मंदिराची संपूर्ण माहिती असेल. जेणेकरून भविष्यात जन्मभूमी आणि राम मंदिराचा इतिहास दिसून येईल आणि कोणता वाद होणार नाही. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी ही माहिती दिली.

3 ऑगस्टपासून सुरू होईल विधी

बिहारमधील रहिवासी असलेले कामेश्वर चौपाल यांनी 9 नोव्हेंबर 1989 रोजी अयोध्येत राम मंदिराची आधारशिला ठेवली होती. तेव्हापासून ते मंदिर बांधण्याची वाट पाहत आहेत. 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराचा पायाभरणी करतील. त्याआधी 3 ऑगस्टपासून वैदिक विधी सुरू होतील. 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या भूमीपूजन सोहळ्याचे दूरदर्शनवर थेट प्रसारण होईल.

200 फूट खोलीच्या मातीचा नमुना घेतला

राम मंदिराचे मुख्य आर्किटेक्ट निखिल सोमपुरा म्हणाले की, पंतप्रधानांच्या कार्यक्रमानंतर मंदिराचे बांधकाम सुरू होईल. 200 फूट खोल मातीचा नमुना घेण्यात आला. त्याचा अहवाल अद्याप आला नाही. रिपोर्टनुसार एलएनटी कंपनी पाया खोदण्यास प्रारंभ करेल. अहवाला आल्यानंतर पायाची खोली निश्चित केली जाईल. मंदिराचा पाया 12 फूट ते 15 फूट दरम्यान राहणार असल्याची चर्चा आहे.

टाईम कॅप्सूल म्हणजे काय?

टाईम कॅप्सूल एका कंटेनर प्रमाणे असते. हे सर्व प्रकारच्या हवामानाचा सामना करू शकते. हे सहसा भविष्यात लोकांशी संवाद साधण्यासाठी वापरले जाते. याद्वारे पुरातत्व शास्त्रज्ञ किंवा इतिहासकारांना अभ्यास करण्यास मदत मिळते. 30 नोव्हेंबर 2017 रोजी स्पेनमधील बुर्गोसमध्ये सुमारे 400 वर्ष जुनी टाईम कॅप्सूल सापडली होती. ती येशू ख्रिस्ताच्या मूर्तीच्या रूपात होते. या पुतळ्यामध्ये सुमारे 1777 पर्यंतची आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक माहिती होती.