आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा373 किलोमीटर आणि 7 दिवसांच्या प्रवासानंतर दोन विशाल शालिग्राम शिळा अयोध्येत पोहोचल्या आहेत. शरयू नदीच्या पुलावर 2-3 हजार लोकांनी पुष्पवृष्टी करून आणि ढोल वाजवून उत्सव वातावरणात त्यांचे स्वागत केले. जय श्रीरामचा जयघोष झाला. या 6 कोटी वर्ष जुन्या शालिग्राम शिळांपासून भगवान श्रीराम आणि देवी सीतेची मूर्ती बनवली जाईल, जी राम दरबारात स्थापित केली जाणार आहे.
भाविकांची एवढी गर्दी झाली की, रामसेवकपुरमपर्यंत शिळा पोहोचण्यासाठी एक तास लागला. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय, डॉ.अनिल मिश्र, महापौर ऋषिकेश उपाध्याय, यांच्या हस्ते रामसेवकपुरम येथे शिळा ठेवण्यात आल्या. सुरक्षेसाठी बाहेर पीएसी-पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
गुरुवारी सकाळी शिळांचे पूजन करण्यात येणार आहे. यानंतर राम मंदिराच्या महंतांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. रामजन्मभूमी संकुलात शिळा ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर 100 महंतांना पूजेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. ओडिशा आणि कर्नाटकातूनही शिळा अयोध्येत येतील. शिल्पकार या सर्वांचा तुलनात्मक अभ्यास करतील. त्यानंतर विश्वस्त त्यांच्या सल्ल्याचा विचार करतील.
मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकारांना पाचारण करण्यात आले
रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, 'राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट भगवान श्रीरामाच्या मंदिरात कोणत्या पद्धतीने मूर्ती बनवायची आणि ही मूर्ती कोणत्या शिळांपासून बनवायची याचा विचार करत आहे. त्यासाठी देशभरातील मूर्तिकारांना पाचारण करून त्यांची मते जाणून घेतली आहेत. देवाच्या मूर्तीचे हावभाव कसे असावेत, याचा सखोल विचार केला जात आहेत.
ओडिशा आणि कर्नाटकातूनही शिळा आणण्यात आल्या आहेत, मात्र त्यांच्या आगमनाची वेळ अद्याप ठरलेली नाही. सर्व शिळा गोळा केल्यानंतर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गर्भगृहातील मूर्ती कोणत्या शिळेपासून बनवायची याचा निर्णय घेतला जाईल.
मूर्ती बनवून गाभाऱ्यात त्यांची प्रतिष्ठापना केली जाईल
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व शिळांची तपासणी केल्यानंतर त्यातील एका शिळेचा वापर गर्भगृहाच्या वरच्या पहिल्या मजल्यावर बनवल्या जाणार्या दरबारातील श्रीरामाची मूर्ती बनवण्यासाठी केला जाणार आहे. त्याचबरोबर लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्तीही याच शिळांपासून बनवल्या जाणार आहेत. सध्या श्रीरामासह चारही भाऊ गर्भगृहात बालरूपात विराजमान आहेत.
या मूर्ती लहान असल्याने भाविकांना त्यांच्या देवतेचे दर्शन होत नाही. अशा स्थितीत या मूर्तींचे मोठे रूप तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. मंदिर प्रशासनाने याला दुजोरा दिलेला नाही.
दोन्ही शिळा 6 कोटी वर्ष जुन्या
रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषद शिळा आणण्यासाठी वर्षभरापासून प्रयत्न करत होते. नेपाळमधील जनकपूर येथील काली नदीतून या शिळा काढण्यात आल्या आहेत. 26 जानेवारीलाशिळा अयोध्येला पाठवण्यात आल्या. यादरम्यान त्या बिहारमार्गे उत्तर प्रदेशातील कुशीनगर आणि गोरखपूरमार्गे बुधवारी रात्री अयोध्येत पोहोचल्या. एका शिळेचे वजन 26 टन, तर दुसऱ्या शिळेचे वजन 14 टन आहे. असे मानले जाते की या शिळा 6 कोटी वर्ष जुन्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.