आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भगवान श्रीरामाचे मंदिर बनण्यापूर्वी बुधवारी जन्मभूमी परिसरातील कुबेर टेकडीवरील कुबेरेश्वर शिवलिंगाचा 28 वर्षानंतर रुद्राभिषेक करण्यात आला. यासाठी मणिराम छावनीचे महंत उत्तराधिकारी कमल नयन दास कुबेर टेकडीवर पोहचले. दोन तास ही पुजा सुरू होती. कुबेर टेकडी राम जन्मभूमी परिसरात आहे. हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) च्या संरक्षणात आहे. यावेळी महंत कमल नयन म्हणाले की, रुद्राभिषेक मंदिर निर्माणात येणाऱ्या सर्व अडचणींना दूर करण्यासाठी आणि कोरोना महामारीला संपवण्यासाठी करण्यात आला आहे.
पुढे म्हणाले की, ‘राम मंदिराच्या निर्माणाची तयारी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट करत आहे. जमिनीच्या सपाटीकरणाचे काम झाले आहे. लवकरच मंदिराचे बांधकाम सुरू होईल. मंदिराचे काम सुरू होण्यापूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते गर्भगृहाच्या भूमी पूजनाचा कार्यक्रम आहे. यासाठी त्यांना आधीच आमंत्रण दिले होते, परंतू कोरोनामुळे हे शक्य झाले नाही. ’
रामललाच्या दर्शनासाठी गेलो होत, तेव्हा मनात इच्छा आली महंत कमल नयन दास म्हणाले की, रामललाचे दर्शन करण्यासाठी गेलो होतो, तेव्हा मंदिराचे काम पाहिले आणि टेकडीवरील केबेरेश्वराचे जीर्ण झालेले मंदिर दृष्टीस पडले. यावेळी मनात शिवलंगाचा रूद्राभिषेक करण्याची इच्छा आली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.