आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ayodhya। The City Of Ayodhya Will Be Illuminated, With 10 Lakh Lamps On 32 Ghats

5 वा विश्व विक्रम:अयोध्या नगरी होणार प्रकाशमय, 32 घाटांवरील 10 लाख दिव्यांनी होणार रामायण काळाचे दर्शन

अयोध्याएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्यामध्ये 5 व्या दीपोत्सव प्रसंगी एक आणखी रिकार्ड तयार केले जाणार आहे. 3 नोव्हेंबरच्या सांयकाळी 32 घाटांवर असणाऱ्या दिव्यांची प्रतिमा पाहण्याजोगी असणार असणार आहे. यासाठी 12 स्वयंसेवक देखील तैनात करण्यात आले आहे. त्यांनी दिव्यांनी रामायण काळ सजवला आहे.

गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंद देण्याची तैयारी
या भव्यदिव्य अशा रामायण काळला डॉ. राममनोहर लोहिया आणि अवध विश्वविद्यापीठाचे कुलपती प्रो. रविशंकर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले आहे. यासाठी 32 तास 200 समन्वयक, 32 पर्यवेक्षक आणि 32 प्रभारींची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये विद्यापीठाचे विद्यार्थींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

विद्यापीठ परिसरातील सुमारे 32 घाटांवर रामकाळला दिव्यांनी सजवण्यासाठी सुमारे 10 लाख दिवे तयार करण्यात आले आहे. 3 नोव्हेंबर रोजी या दिव्यांमध्ये तेल काढण्यात येणार आहे. त्यातीन 9 लाख 51 हजार दिवे प्रकाशमय केले जाणार आहे. त्यात प्रत्येक स्वयंसेवकाला सुमारे 75 दिवे प्रकाशमय करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात घाट क्र. 2 ला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असे नाव देण्यात आले आहे. तसेच घाट क्र. 3-4 ला राम आणि रावणाच्या युद्धाचे प्रसंग पाहायला मिळणार आहे. तर घाट क्र. 5-6 मध्ये रामभक्त हनुमान आणि एक भारत श्रेष्ठ भारत असा लोगो पाहायला मिळणार आहे.

स्वयंसेवकांसाठी केली व्यवस्था

विश्वविद्यापीठाचे नोडल अधिकारी डॉ. शैलेंद्र वर्मा यांनी सांगितले की, स्वयंसेवकांला येण्या-जाण्यासाठी आम्ही बसची व्यवस्था केली आहे. कोरोनाचे नियम पाळूनच ते दिवे प्रकाशमय करणार आहे. सोबत त्यांना ओळखपत्र दाखूनच प्रवेश दिले जाणार आहे.

अशा प्रकारे केली जाणार दिव्यांची मोजणी

वर्ल्ड रिकॉर्ड बुकच्या टाईम कंसल्टंट निश्चल भनोट यांनी सांगितले की, रिकार्डमध्ये नोंद करण्यासाठी प्रत्येक दिव्याला किमान पाच मिनिटे जळणे आवश्यक आहे. आम्ही एका ड्रोनच्या साहाय्याने त्याची मोजणी करणार आहोत.

बातम्या आणखी आहेत...