आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ayodhya The New Mosque Can Accommodate 2,000 People, The Roof Oval And Transparent

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अयोध्या:नव्या मशिदीत 2 हजार जण नमाज अदा करू शकतील, छत अंडाकृती आणि पारदर्शक

अयोध्याएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील अयोध्येत तयार होणारी नवी मशीद अंडाकृती असेल. छत पारदर्शी असेल. सोलर पॅनलही लावले जातील. येथे जवळपास २ हजार लोक एकाचवेळी नमाज अदा करू शकतील. नव्या मशिदीचा आराखडा इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्टने तयार केला आहे. अयोध्येजवळच्या धन्नीपूर गावात ती जवळपास १५ हजार चौरस फूट जागेवर बनवली जात आहे. मशिदीसोबत रुग्णालय, इंडो- इस्लामिक संशोधन केंद्र आणि सार्वजनिक स्वयंपाकघरही असेल. जामिया मिलिया इस्लामियाचे प्राध्यापक एस. एम. अख्तर त्यांच्या सहकाऱ्यांसह आराखडा तयार करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत राम जन्मभूमी परिसरातील वादग्रस्त जमिनीचा मालकी हक्काचा वाद सोडवत पूर्ण जमीन हिंदूंना सोपवली होती.

काळा वा विजय दिवस साजरा करू नये : अन्सारी
अयोध्या प्रकरणातील मुख्य पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांनी आवाहन केले की, आता सर्वोच्च न्यायालयात बाबरी प्रकरणाचा निपटारा झाला आहे. तर, एआईएमआईएम नेते असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, अन्याय विसरता कामा नये.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser