आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअयोध्येतील राम जन्मभूमी परिसर क्षेत्रात तैनात 4 महिला कॉन्स्टेबलचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात एक महिला पोलिस 'पतली कमरिया' गाण्यावर डान्स करताना तर इतर दोघी तिला साथ देताना दिसून येत आहेत. बाजूला उभी अन्य एका कॉन्स्टबलने या गाण्याचा व्हिडिओ शूट केला. या कृत्यावर हनुमानगढीच्या पुजाऱ्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे, SSPने या चारही महिला पोलिसांना हजर होण्याचे आदेश दिलेत.
10 सेकंदांचा व्हिडिओ झाला व्हायरल
10 सेकंदांचा हा व्हिडिओ एक आठवडा जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. कविता पटेल, कामिनी कुशवाहा, कशीश साहनी व संध्या सिंह अशी व्हिडिओ तयार करणाऱ्या 4 महिला कॉन्स्टेबल्सची नावे आहेत. या सर्वजणी रामलला गर्भगृहापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर कर्तव्यावर तैनात होत्या. त्यांनी दुपारच्या सुमारास निवांतपणी हा व्हिडिओ तयार केला. यावेळी मंदिर भाविकांसाठी बंद असते.
हा रामलला व त्यांच्या भक्तांचा अवमान - हनुमानगढीचे पुजारी रमेश दास
हनुमानगढीचे पुजारी रमेश दास म्हणाले - "रामलला कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यांच्या सुरक्षेत तैनात महिला पोलिसांनी अश्लील गाण्यावर नृत्य केले. हा रामलला व त्यांच्या भक्तांचा अवमान आहे. या प्रकरणी महिला पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे."
SSP म्हणाले - चौकशीनंतर कारवाई
या प्रकरणी SSP मुनिराज म्हणाले, "चारही महिला कॉन्स्टेबल्सची VVIP ड्यूटीत तैनात करण्यात आले होते. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी त्यांना लाइन हजेरीचे आदेश देण्यात आलेत. चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.