आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अयोध्येत नवे पर्व:अयोध्यानगरी सुंदर नटली, स्वच्छ झाली...रस्त्यांना आली चकाकी, सर्वांच्या चेहऱ्यावर एक नवी चमक

त्रिभुवन | अयोध्या3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक दशकांपासून सुनसान अयोध्यानगरीतील युवकांनाही भविष्याबद्दल आशा...

शरयू नदी अगदी खळाळून वाहते आहे. प्रवाह इतका वेगवान की लाटांच्या पलिकडे किनाराच दिसत नाही. लहानपणी या नदीच्या किनारी दुकाने थाटणारे असोत किंवा मोठे व्यापारी असोत, या सर्वांच्या चेहऱ्यावर एक नवी चमक आहे. अयोध्येतील राममंदिराबाबत काहीही राजकारण होवो, अयोध्या आता हरिद्वार आणि तिरुपती या देवस्थांनाना मागे टाकणार आहे, हे युवकांना चांगले माहिती आहे. परंतु, रामंमंदिराच्या जवळपास राहणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर मात्र या नवनिर्मितीच्या काळात होणाऱ्या तोडफोडीबद्दल असलेली भीती स्पष्ट दिसते. दुसरीकडे, नवी पिढी मात्र आशावादी आहे. आपले उज्ज्वल भविष्य ती यात पाहते आहे. अयोध्या देवीपाटन हॉटेल असोसिएशनचे अनिल अग्रवाल सांगतात, येथे २ हजारांहून अधिक हॉटेल उघडले जाण्याची शक्यता तर आहेच, शिवाय रेल्वेची सेवा वाढेल, विमानतळ होतील आणि पर्यटन विकासाच्या प्रचंड शक्यता आहेत. रामनवमी असो किंवा दिवाळी, या काळात अयोध्येत जगभरातून भाविक येतील. शरयूचा महिमा असा की येथे श्रावणात एका दिवसात १५-१५ लाख भाविक येतात. गेल्या वर्षी २ कोटी पर्यटक येथे आले होते.

श्रीराम पौडी आणि नया घाटपासून रामलल्ला मंदिरापर्यंत अयोध्यानगरी सजली आहे. या नगरीचे रंगरूप पालटले आहे. पूर्वी अगदी पुरातन किंवा साधारण दिसणारी ही ऐतिहासिक नगरी आता सनातन धर्माचे प्रमुख तीर्थक्षेत्र होत आहे. दुसरीकडे, हिंदुत्वाचे राजकारणही या भूमिपूजनाच्या माध्यमातून नव्या उसळीचे संकेत देत आहे. आज एक नवी आयोध्या सर्वांच्या नजरेसमोर आहे.

ही अयोध्या तेव्हाच्या अवधपासून अगदी वेगळी आहे. येथील लोकही आता सहजपणे सांगू लागले आहेत की, जुनी अयोध्या आता जुने अवध नाही. अयोध्येवर आता एक दुसरा रंग चढत आहे. पिवळ्या रंगातील इमारतींची दारे मात्र भगव्या रंगाने सजत आहेत. कालपर्यंत अयोध्येत जो भाग सुनसान होता तेथे आता बोलकी घरे दिसत आहेत. याच घरांच्या अंगणांत आता मोदी-योगी यांचे नवे राजकारण आकार घेईल.

कोरोनामुळे सर्वत्र घबराट आहे. तरीही देशभरातून यात्रेकरू अयोध्येत येतच आहेत. अयोध्याजवळ फैजाबाद भागात राजकोटचे गोविंदभाई मेहता यांनी सांगितले, की ते लहानपणापासून अयाध्येत येत आहेत. पूर्वी हे अगदी स्तब्ध आणि सुनसान शहर असे. आता याचे रूपच बदलत आहे. रामंमंदिराच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या दीपोत्सवात आनंदाचे दीप प्रज्ज्वलित करण्यासाठी ते येथे आल्याचे सांगतात. त्यांच्यासारखे अनेक लोक या दीपोत्सवासाठी अयोध्येत आले आहेत. स्थानिक लोक सांगतात, राममंदिर उभारणार हे चांगलेच... एक इच्छा पूर्ण होईल. परंतु कोरोनामुळे सध्या अवधमधील उत्साह, आनंद मावळलेला आहे. दुसरीकडे राजकीय लाटा मात्र उठत आहेत. विशेषत: भाजप आणि हिंदुत्वाचे ढग या श्रावणात गरजताहेत... बरसताहेत. जागोजाग लागलेले मोठमोठे होर्डिंग याची साक्ष देत आहेत.’

पंतप्रधान मोदी अयोध्येत तीन तास थांबण्याची शक्यता
पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच अयोध्येत येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे सुमारे तीन तास थांबण्याची शक्यता आहे. यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. शिवाय, सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. साकेत महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर उतरेल. तेथून मंदिर स्थळापर्यंत सजावटीसह विविध धार्मिक देखावे सादर केले जातील.

तिरुपतीचा आदर्श; धार्मिक स्थळे बदलून टाकतात परिसराची अर्थव्यवस्था
आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात २१ हजार कर्मचारी आहेत. रोज ६५ हजार भाविक येतात. मंदिरातील धर्मशाळांशिवाय शहरात ८ हजारहून अधिक हॉटेल आहेत. त्यांचे उत्पन्न भाविकांवरच अवलंबून आहे. या हॉटेलांत हजारो कर्मचारी आहेत. रोज २० हजारांहून अधिक ऑटो-टॅक्सी चालतात. येथे अब्जावधी रुपयांची विकासकामे झाली आहेत. १ हजारहून अधिक दुकाने-रेस्तराँ भाविकांवरच चालतात. २ लाख कुटुंबांचे उत्पन्न या भाविकांवर, पर्यटकांवर अवलंबून आहे.