आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • AYUSH Minister Sripad Naik'S Car Accident At Ankola Wife Vijaya Expired News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्रीय मंत्री अपघातात जखमी:कर्नाटकातील अंकोला येथे मंदिरातून परतताना श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नी आणि पीएचा मृत्यू

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्नाटकाच्या अंकोला येथे झाला अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडली दुर्घटना

आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला सोमवारी कर्नाटकातील अंकोला येथे अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत श्रीपाद नाईक यांच्या पत्नीचा मृत्यू झाला तर नाईक गंभीर जखमी आहेत. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे समजते.

कर्नाटकातील अंकोला तालुक्यातील होसाकंबी गावातून प्रवास करता श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटल्याचे सांगितले जात आहे. ते यालपुराहून गोकर्ण येथे प्रवास करीत होते. त्यांच्या पत्नीला या अपघातात गंभीर दुखापत झाली व रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. श्रीपाद नाईक यांच्याशिवाय इतर तिघांना किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र दुर्देवाने यामध्ये श्रीपाद नाईक यांच्या पत्नी आणि पीएचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...