आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबा का ढाबाचे मालक रुग्णालयात दाखल:कांता प्रसाद यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न, दारु आणि झोपेच्या गोळ्या खाल्यानंतर झाले होते बेशुद्ध

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 80 वर्षांचे कांता प्रसाद चालवतात स्टॉल

दिल्लीतील प्रसिद्ध बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनुसार, दारु आणि झोपेच्या गोळ्या खाल्ल्यानंतर ते बेशुद्ध झाले होते. त्यांच्या मुलाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. सध्या सफदरजंग रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरुवातीच्या तपासात पोलिसांनी त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा अंदाज लावला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

कुटुंबाला कारण माहिती नाही
या प्रकरणी कांता प्रसाद यांच्या पत्नी बदामी देवी यांचे म्हणणे आहे की, मला काहीच माहिती नाही. त्यांनी काय खाल्ले मी पाहिले नाही. ते बेशुद्ध झाले तेव्हा मी ढाब्यावर होते. डॉक्टरांनीही आतापर्यंत आम्हाला काहीच सांगितलेले नाही. त्यांच्या डोक्यात काय सुरू होते हे मला माहिती नाही.

80 वर्षांचे कांता प्रसाद चालवतात स्टॉल
80 वर्षांचे कांता प्रसाद आपल्या पत्नीसोबत साउथ दिल्लीमध्ये मालवीय नगरमध्ये 'बाबा का ढाबा' च्या नावाने स्टॉल चालवतात. गेल्यावर्षी कोरोनामुळे त्यांचे काम खूप मंद गतीने सुरू होते. यानंतर त्यांनी एका व्हिडिओमध्ये त्यांची व्यथा जगाला सांगितली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. यानंतर त्यांच्या ढाब्यावर मटर-पनीर खान्यासाठी ग्राहकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली.

बॉलिवूड सेलेब्सही आले समर्थनात
वयस्कराला सपोर्ट करण्यासाठी अभिनेत्री रवीना टंडन, सोनम कपूर, स्वरा भास्करसह अनेक सेलेब्स पुढे आले होते. या सेलेब्सने सोशल मीडियावर लोकांना बाबांना मदत करण्याचे आवाहन केले होते.

काही महिन्यांनंतर रेस्तरॉही उघडले
गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये 80 वर्षांच्या कांता प्रसाद यांनी दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये एका नवीन रेस्तरॉची सुरुवात केली होती. त्यांनी याचे नाव 'बाबा का ढाबा' असेच ठेवले होते आणि हे त्यांच्या स्टॉल जवळच होते. काही दिवसांनंतर त्यांना हे रेस्तरॉ बंद करावे लागले होते.

आर्थिक तंगीमुळे बंद करावे लागेल रेस्तरॉ
त्यांनी सांगितले होते की, रेस्तरॉ 15 फेब्रुवारीलाच बंद करावे लागले. हे चालवण्यासाठी एक लाख रुपयांचा खर्च येत होता आणि आम्हाला 36 हजार रुपये कर्मचाऱ्यांना द्यावे लागत होते. याचे भाडे 35 हजार रुपये महिना होते. आम्हाला यामध्ये नुकसान होत होते, यामुळे हे बंद करणे गरजेचे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपला जुना ढाबा पुन्हा सुरू केला होता.

बातम्या आणखी आहेत...