आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Baba Ramdev Allopathy Statement Update | Indian Medical Association (Ima) Uttarakhand Filed Defamation Case Against Yoga Guru

रामदेव बाबांवर 1000 कोटींचा खटला:IMA ने पंतप्रधानांना लिहिले पत्र - योगगुरुंनी दावा केला की, लसीचे 2 डोस घेतल्यानंतर लाखो लोकांचा झाला मृत्यू, त्यांच्यावर देशद्रोहानुसार कारवाई व्हावी

देहरादून2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • IMA च्या राष्ट्रीय युनिटने या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) उत्तराखंडने बुधवारी योग गुरू बाबा रामदेव यांच्यावर 1000 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. असोसिएशनने हा खटला रामदेव बाबा यांच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या आधारे दाखल केला आहे, ज्यामध्ये बाबा अ‍ॅलोपॅथीला कचरा आणि दिवाळखोर विज्ञान म्हणत आहेत.

त्याचबरोबर IMA च्या राष्ट्रीय युनिटने या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की पतंजलीचे मालक रामदेव यांच्या लसीकरणावर चुकीची माहिती देण्यावर बंद घातली पाहिजे. एका व्हिडिओमध्ये त्यांनी दावा केला आहे की लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही 10,000 डॉक्टर आणि लाखो लोक मरण पावले आहेत. त्यांच्यावर देशद्रोहाच्या आरोपाखाली खटला चालवला पाहिजे.

रामदेव यांनी लेखी माफी मागावी
बाबा रामदेव यांनी नंतर आपले वक्तव्य मागे घेतले होते. यावर असोसिएशनचे म्हणणे आहे की रामदेव यांनी दिलेल्या निवेदनाला उत्तर म्हणून, जर त्यांनी येत्या 15 दिवसांत व्हिडिओ प्रसिद्ध केला नाही आणि लेखी माफी मागितली नाही तर त्यांच्याकडून 1000 कोटी रुपयांची भरपाई मागितली जाईल.

IMA ने नोटीस पाठवली होती यापूर्वी इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) शनिवारी बाबा रामदेव यांच्यावर अ‍ॅलोपॅथी उपचाराविरूद्ध खोटा प्रचार केल्याचा आरोप केला होता. IMA ने रामदेव यांना कायदेशीर नोटीस पाठवली. रामदेव यांच्यावर खटला चालवण्याची मागणीही डॉक्टरांच्या समितीने केली होती. मात्र रामदेव यांची संस्था पतंजलीने निवेदन जारी करुन हे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले होते.

रामदेव यांनी DGCI च्या विश्वासार्हतेला आव्हान दिले आयएमएने लिहिले आहे की, 'रामदेववीर यांनी असा दावा केला आहे की रेमेडसवीर, फॅविफ्लू आणि DGCI ने अप्रूव्ह दुसऱ्या ड्रग्समुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) आणि आरोग्यमंत्री यांच्या विश्वासार्हतेला आव्हान दिले आहे. जून-जुलै 2020 मध्ये कोरोना रूग्णांच्या उपचारांमध्ये रेमाडेसिविरच्या वापरास केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) ने मान्यता दिली. हे भ्रम पसरवण्यासाठी आणि कोट्यावधी लोकांचे जीवन धोक्यात आणल्याबद्दल बाबा रामदेव यांच्यावर खटला चालवला पाहिजे. रामदेव यांनी फेवीपिराविरला तापेचे औषध असे म्हटले होते. यावरुन कळते की, मेडिकल सायन्सविषयी त्यांना किती कमी ज्ञान आहे.'

यापूर्वीही वादग्रस्त विधाने केल्याचा आरोप IMA ने पत्रात लिहिले आहे की, यापूर्वी कोरोनासाठी बनविलेले औषध लाँच करतानाही रामदेव यांनी डॉक्टरांना मारेकरी म्हटले होते. या कार्यक्रमात आरोग्यमंत्रीही उपस्थित होते. सर्वांना ठाऊक आहे की बाबा रामदेव आणि त्यांचे साथीदार बाळकृष्ण आजारी असताना अ‍ॅलोपॅथी उपचार घेतात. असे असूनही ते त्यांच्या अवैध औषधांची विक्री व्हावी यासाठी अ‍ॅलोपॅथीबद्दल सतत भ्रम पसरवत आहेत. याचा परिणाम मोठ्या लोकसंख्येवर होत आहे.

बातम्या आणखी आहेत...