आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हत्तीवरुन पडले योग गुरू:हत्तीवर बसून योगा करताना बाबा रामदेव पडले खाली, व्हिडिओ व्हायरल

मथुरा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

योग गुरू बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात ते हत्तीवर बसून योग करत असताना अचानक पडल्याचे दिसत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, हत्तीवर बसून योग करत असताना अचानक हत्ती पुढे सरकला आणि बाबा रामदेव खाली पडले. चांगली बाब म्हणजे, यात बाबा रामदेव यांनी कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही.

सोशल मीडियावर उडाली खिल्ली

ही घटना सोमवारी मथुरेतील महावनमधील आश्रमात घडली. सोशल मीडियावर या घटनेची खिल्ली उडवली जात आहे. एका यूजरने बाबा रामदेव यांना जोकर म्हटले. दुसऱ्या एका यूजरने लिहीले, बाबा जीडीपीसाठी नवीन मस्कट होऊ शकतात.