आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर इंटरव्ह्यू:​​​​​​​रामदेव - त्यांनी जीव वाचवले, मग आम्ही भंडाऱ्यात जेवायला आलोय का? ॲलोपॅथीने 10% गंभीर रुग्णांचा उपचार, 90% योग-आयुर्वेदाने बरे झाले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दै. भास्कर : ॲलोपॅथीवर टीका का? डॉक्टरांनीच लाखांचे जीव वाचवलेत..
  • ॲलोपॅथीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर वादंग उठले असताना रामदेव बाबा यांनी वृत्तपत्राला दिलेली पहिलीच मुलाखत...

कोरोनावरील उपचार व लसीवरून रणकंदन सुरू असताना आज देशाच्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठा वाद योगगुरू रामदेव बाबा व इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) यांच्यात सुरू आहे. आयएमएकडून देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी व अब्रुनुकसानीच्या दाव्यादरम्यान रामदेव बाबा यांनी प्रथमच वृत्तपत्राला मुलाखत दिली. दैनिक भास्करच्या अरुण चौहान यांच्याशी विशेष चर्चेत रामदेव यांनी दावा केला की अॅलोपॅथीने फक्त १०% गंभीर रुग्णांवर उपचार केले. ९०% योग-आयुर्वेदाने बरे झाले. कोरोनाच्या सज्जतेपासून कुंभसह अनेक विषयांवर त्यांनी उत्तरे दिली.

अमेरिकेसारख्या देशांनी तिसऱ्या व चौथ्या लाटेचा अचूक अंदाज लावला, तयारीही केली. आपल्या देशातही यासाठी उच्चस्तरीय पॅनल आणि संपूर्ण यंत्रणा आखलेली आहे... कोरोनाविरुद्ध भारताकडून धोरणात्मक पातळीवर कायम चूक झाल्याचे तुम्हाला वाटते?
मी राजकीय पक्ष-विरोधी पक्षाच्या भानगडीत पडणार नाही. आता राजकीय किंवा जे पॅनल स्थापले आहेत त्यांच्या पातळीवर म्हणा... कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज वैज्ञानिक, कार्यपालिका, कायदेमंडळ, वृत्तसंस्था या पैकी कुणीही लावू शकले नाहीत. पूर्व अनुमानच नसल्याने अपेक्षित तयारीही करता आली नाही.

तुम्ही जगभरात योगाचा प्रचार केला, महामारीत अॅलोपॅथीविरुद्ध तुम्ही मोर्चा का उघडला?
या काळातच लोकांना योग-नॅचरोपॅथीची सर्वाधिक गरज आहे. ही अॅलोपॅथीविरुद्ध आघाडी नाही. आजाराच्या कारणाचे निवारण केले जावे, हा उद्देश आहे. आजारामुळे कमकुवत फुप्फुसे, कमकुवत यकृत-हृदय, कमकुवत रोग प्रतिकारक्षमता, मज्जासंस्था-मनोबलही कमकुवत. दुर्दैवाने अॅलोपॅथीत त्याचा इलाज नाही. ते फक्त सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट करत आहेत.

मात्र याच डॉक्टरांनी कोरोनाकाळात लाखो लोकांवर उपचार केला, जीवही वाचवले...
या डॉक्टरांनीच उपचार केले, असे म्हणणे सर्वात मोठा खोटारडेपणा आहे. आजाराच्या मूळ कारणाचा इलाज फक्त योग-नॅचरोपॅथीत अाहे. फक्त डॉक्टरांनी उपचार केले असतील तर आम्ही काय मग भंडाऱ्यात जेवायला आलो का? माझ्या मते डॉक्टरांनी खूप काही केले. मात्र उपचार डॉक्टरांनी केलेत, असे म्हणणे पूर्णपणे चूक व तथ्यहीन बाब आहे. ज्यांची ऑक्सिजन पातळी ७० पर्यंत आली होती, त्यांनीही योग व देशी उपायांनी स्वत:ला बरे केले आहे. डॉक्टरांनी नक्कीच गंभीर रुग्णांवर उपचार केले. डॉ. गुलेरिया म्हणतात, ९०% लोकांना रुग्णालयात जाण्याची गरज भासली नाही. मी म्हणतो, ९५ ते ९८% लोकांना रुग्णालयात जावे लागले नाही. ते बरे झाले आयुर्वेद, योग आणि निकोप जीवनशैलीमुळे.

मग कोरोनाच्या होमकिटमध्ये सरकारने कोरोनिलचा समावेश का केला नाही?
हा आमचा दोष नाही, हा सरकारी धोरणांचा दोष आहे. तुम्ही ते आमच्यावर का लादता? कुठल्याही शहरात पाहा, कोरोनाच्या १०० पैकी ९० रुग्णांनी योग, प्राणायाम, आयुर्वेदिक पद्धती आणि निरोगी जीवनशैलीद्वारे स्वत:ला बरे केले. मग फक्त अॅलोपॅथी डॉक्टरांनी लोकांचे प्राण वाचवले असे कसे म्हणू शकता? त्यांनीही लोकांचे प्राण वाचवले आहेत, हे मला मान्य आहे. अनेक डॉक्टरांनी आपले प्राण देऊन रुग्णांचे प्राण वाचवले आहेत, त्यांचे आभार. अशा संकटात त्यांनी तर मदत करायलाच हवी होती, अन्यथा मेडिकल सायन्सला काय अर्थ?

गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात गेलेल्या १०% लोकांचे प्राण या डॉक्टरांनी वाचवले हे मी मान्य करतो, पण ९०% लोकांचे प्राण योग-आयुर्वेद व नैसर्गिक जीवनशैलीने वाचवले. मग डॉक्टरांचा माझ्या मुद्द्याला आक्षेप का आहे? कारण त्यांचा मोठा व्यवसाय त्याच्याशी संबंधित आहे. पण ते बळाच्या आधारावर वस्तुस्थिती दडवू शकत नाहीत. मी अॅलोपॅथीचा विरोधक नाही. आपत्कालीन उपचार म्हणून व गंभीर शल्य चिकित्सेसाठी आधुनिक मेडिकल सायन्सने खूप काम केले आहे, पण लाइफस्टाइल डिसीजवर त्यांच्याकडे कुठलाही उपाय नाही.

ते ताकदीच्या बळावर वस्तुस्थिती लपवू शकत नाहीत, असे तुम्ही म्हणता. व्हिडिओत तुम्ही असे म्हणत असल्याचे दिसते की, कोण आहे जो मला अटक करू शकतो...
माझी ताकद आर्थिक ताकद नाही. फार्मा इंडस्ट्री, हॉस्पिटल इंडस्ट्री आणि डॉक्टरांचा व्यवसाय मिळून जगात किमान २०० लाख कोटींचा व्यवसाय आहे. त्यांच्यासमोर तर बाबा रामदेव म्हणजे उंटाच्या तोंडातील जिऱ्याएवढाही नाही. पण माझी ताकद म्हणजे सत्याचे बळ. माझी पोहोच १२५ कोटी लोकांपर्यंत आहे. माझ्याकडे पूर्वजांचे ज्ञान आणि आधुनिक संशोधन दोन्ही आहे, माझी ताकद हीच आहे. मी कधी ईश्वरी शक्ती आणि देशाच्या राज्यघटनेवर अतिक्रमण केले नाही, मग मी का घाबरू?

डॉक्टर्स तर म्हणतात की, तुमच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला जावा...?
जर स्वामी रामदेव देशद्रोही असेल तर देशभक्त कोण? देशाची सेवा करणे देशद्रोह असेल तर धर्मांतराशी लागेबांधे असलेले देशभक्त आहेत का? कोरोना चांगला आहे, त्यामुळे धर्मांतर चांगले होईल, असे ते म्हणतात. औषधाची गरज नाही, विशिष्ट धर्माची कृपा झाली तर बरे होतील. असे धर्मांतर व अंधविश्वासावर विश्वास ठेवणारे तर आयएमएचे अध्यक्ष आहेत. मी तथ्य-पुराव्यासह मुद्दा मांडला नाही, असे एक तरी उदाहरण सांगा.

तुम्ही म्हणता की, गंभीर रुग्णांचे प्राण डॉक्टरांनी प्राणांची बाजी लावून वाचवले आहेत, तुम्ही त्यांच्याच मृत्यूचा उपहास करत आहात...
मी डॉक्टरांच्या मृत्यूचा उपहास केला नाही. डब्ल्यूएचओच्या आकड्यांनुसार सुमारे दीड कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यात डॉक्टरांचाही मृत्यू झाला आहे. स्वामी रामदेव असताना कोण कसे काय मरू शकतो, असे म्हणून ते मला टोमणा मारतात. मी काही सर्वशक्तिमान नाही. ते म्हणतात, आम्ही तर सर्वशक्तिमान आहोत, आम्हाला कोणी आव्हान देऊ शकत नाही. मी तर म्हटले, तुमच्याही डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे, आम्हाला दु:ख आहे, वेदना आहे. दोन डोस घेतल्यानंतरही हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.

  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज कुणालाही लावता आला नाही...यामुळे त्याबाबतची अपेक्षित तयारीही करता आली नाही.
  • कुंभमेळ्याला सुपर स्प्रेडर म्हणणे साफ खोटे... मी स्वत: पाहिले होते, तेथे 99% तंबू रिकामे होते.

कुंभला सुपर स्प्रेडर म्हणणे साफ खाेटे...मी स्वत: बघितले हाेते, 99 % तंबू रिकामे हाेते

दुहेरी लसीकरणानंतर हजाराे डाॅक्टरांचा मृत्यू झाल्याचा पुरावा काय ?
अहाे, या गाेष्टीचा पुरावा तर तुम्हाला मिळेल. मी दुहेरी लसीकरणाचा सर्वांशीच संबंध लावलेला नाही. सर्वंकष असे मी म्हणालाे. अाता हजाराे डाॅक्टरांचा मृत्यू झाला अाहे. तुम्ही डब्ल्यूएचअाेचा डेटा काढून बघू शकता. जवळपास एक लाख डाॅक्टर्स व अाराेग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला अाहे. यात मी भारत वा जगाची अाकडेवारी तर दिलेली नाही. केवळ लस वाचवू शकणार नाही. एकीकडे तुम्ही लसीचा दुहेरी डाेस घ्या अाणि दुसरीकडे तुम्ही याेग अाणि अायुर्वेदाचा दुहेरी डाेस घ्या.

कोरोनिल लाँच झाले त्या वेळीही माेठा वाद झाला. डब्ल्येएचअाेने मंजुरी दिल्याचा दावा हाेता. यासाठी काही प्रयत्न केले अाहेत का ?
डब्ल्यूएचअाेने काेव्हॅक्सिनलाही मंजुरी दिलेली नाही. त्याची प्रक्रिया वेगळी असून वेगळ्या प्रकारचे लाॅबिंग अाहे, त्याचंा स्वत:चा हट्ट अाणि दुराग्रह अाहे. डब्ल्यूएचअाेला फंडिंग काेठून हाेते हे तुम्हाला माहिती अाहे का ? त्यांच्यामागे फार्मा उद्याेग भक्कमपणे असल्याने अमेरिकेच्या काेणत्याही गाेष्टींचा त्यांच्यावर परिणाम हाेत नाही. मंजुरीसाठी अाम्ही सध्या प्रयत्न केलेला नाही. अाम्ही केलेली क्लिनिकल कंट्राेल चाचणी अांतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली. अायुष मंत्रालयाने काेराेना अाैषधाच्या रुपात मान्यता दिली अाहे.

काेराेनामुळे कसा मृत्यू झाला? नदी किनारी मृतदेहांची रांग अापण बघितली...
मृतांच्या संख्येबद्दल अजूनही गैरसमज अाहेत. किती लाेकांना काेराेना झाला अाणि त्यातील किती बरे झाले याची अाकडेवारी सत्यतेच्या जवळपासही नाही. पण तरीही एखाद्या गावात दाेन, काहींमध्ये पाच तर काहींमध्ये दहा जणांचा मृत्यू झाला असे म्हटले जाते.पण लाेकांनी काेराेनाला स्वत:च्या सामर्थ्याने पराभूत केले हे खरे.

तुमच्या दृष्टीने ५ राज्यांतील निवडणुका वा कुंभ टाळायला हवे हाेते का ?
मी हरिद्वारमध्ये राहताे. हरकी पैडीचे दृश्य बघून कुंभ सुपर स्प्रेडर बनला असे म्हणाल तर ते सपशेल खाेटे अाहे. यामध्ये हिंदूविराेधी, भारतविराेधी लाॅबी अाणि साेशल मीडियाची जमात सहभागी असून त्यांना इंटरॅनशनल फंडिंग मिळत अाहे. कुंभमध्ये ९९ % तंबू रिकामे हाेते. प्रत्येक अाखाड्यात ५०० ते १००० साधू हाेते त्यातील २-३ जणांचा मृत्यू झाला. देशात ५ ते ७ लाख साधू असून त्यातील पाच जणांचा काेराेनाने मृत्यू झाला तर कुंभमुळे काेराेनाचा फैलाव झाल्याचे लाेकांनी पसरवले.

लसीकरणाबराेबर याेग-अायुर्वेदवर सरकारला काही धाेरण सुचवले अाहे का ?
मी केंद्राला प्रस्ताव दिला असून एक जनहित याचिका दाखल करणार अाहे. {हा वाद मिटवणार कसा ?
अाधुनिक चिकित्सा विज्ञान अाणि याेग-अायुर्वेदची भूमिका किती हे निश्चित करावे लागेल.

डॉक्टर तर तुमची जाहीर माफी व देशद्राहाेच्या खटल्यावर अडून अाहेत..
मी राजद्राेह केला नाही, ज्या विधानाची गाेष्ट करत अाहेत ते विधान माझे नाही. मी साेशल मीडियावर एक संदेश वाचला हाेता, जाे मागे घेतला. चर्चा संपली. अाता काय हवे, मला फाशी देणार का ?

पण पत्र लिहून अायएमएला प्रश्न विचारले. तुमचा नवीन व्हिडिअाे अाला. नव्याने वाद सुरू झाला..
प्रश्न विचारणे गुन्हा अाहे का ? प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य असलेलाच पुराेगामी समाज अाहे. मी फक्त एवढेच विचारले की, तुमच्याकडे या २५ अाजारांवर उपचार अाहे.. अायुर्वेदात अाहे.

तुमची पेट्राेल-डिझेलच्या किमती व काळ्या पैशाशी संबंधित विधाने लाेकांना अाठवतात. हे मुद्दे अाजही प्रासंगिक अाहेत की नाही ?
पेट्राेल-डिझेलवरील कर हटवा, किमती कमी कमी हाेतील. सरकारे म्हणतात देश चालवण्यासाठी कर गरजेचा अाहे. काळ्या पैशाचा मुद्दा माेदी यांच्यावर साेडून दिला अाहे. कलुषित मने बरी करण्याचा विडा अाम्ही उचलला अाहे.

बातम्या आणखी आहेत...