आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Babari Masjit Matter : Iqbal Ansari Appeals To Court To Acquit Everyone In Babri Case

30 सप्टेंबरला निकाल:बाबरी प्रकरणात सर्वांना दोषमुक्त करा, बाबरी मशिदीचे पक्षकार इक्बाल अन्सारी यांचे कोर्टाला आवाहन

अयोध्याएका महिन्यापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • बाबरी प्रकरणात अडवाणी, कल्याणसिंह, जोशी यांच्यासह 48 आरोपी

अयोध्येत वादग्रस्त ढाचा पाडल्याच्या प्रकरणात ३० सप्टेंबरला निकाल येणार आहे. त्याआधी बाबरी मशीद प्रकरणातील पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी, “लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याणसिंह यांच्यासह सर्व ४८ आरोपींची निर्दोष मुक्तता करावी,’ असे आवाहन सीबीआयच्या न्यायालयाला केले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अन्सारी म्हणाले की, “बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील आरोपींपैकी अनेकांचा मृत्यू झाला आहे. जे जिवंत आहेत, ते आता वृद्ध झाले आहेत. सर्व गुन्हे मागे घ्यावेत आणि हे संपूर्ण प्रकरण संपवावे, अशी माझी इच्छा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तसाही कुठला वाद राहिलेला नाही. राम मंदिराचे बांधकामही सुरू झाले आहे.’ न्यायालय ३० सप्टेंबरला निकाल देणार आहे. त्यासाठी आदेश जारी करून सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. न्यायालयाने अडवाणी यांच्यासह इतर आरोपींना तशी नोटीस पाठवली आहे. अयोध्येत कारसेवकांनी ६ डिसेंबर १९९२ रोजी वादग्रस्त ढाचा पाडला होता. या खटल्यात एकूण ४८ आरोपींच्या विरोधात खटला सुरू होता. त्यापैकी १६ जणांचा मृत्यू झालेला आहे. इतर ३२ जण न्यायालयात हजर होतील.

अडवाणी, कल्याणसिंह, जोशी यांच्यासह ४८ आरोपी

तब्बल २८ वर्षे जुन्या बाबरी मशीद विध्वंस प्रकरणामध्ये माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती, साक्षी महाराज, साध्वी ऋतंभरा, विश्व हिंदू परिषदेचे नेते चंपत राय यांच्यासह ३२ आरोपी आहेत.