आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना असलेल्या बाबरी मशिदीच्या विद्ध्वंस प्रकरणाला आता 30 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून उत्तर प्रदेश सरकारने हाय अलर्ट जारी केला आहे. मथुरेत कलम 144 लागू करण्यात आले आहे. अखिल भारत हिंदू महासभेने आज मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमी-इदगाह संकुलात लाडू गोपाळाचा जलाभिषेक आणि हनुमान चालीसा वाचण्याची परवानगी मागितली आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
6 डिसेंबर 1992 रोजी कार सेवकांनी बाबरी मशिदीचा विद्ध्वंस केला होता. या घटनेमुळे देशभर दंगल उसळली होती. त्यात 2000 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. राम मंदिराच्या ठिकाणी सोळाव्या शतकात बाबरी मशीद बांधण्यात आली होती, असे मत कार सेवकांचे होते.
इदगाह मशिदीजवळील रेल्वे मार्ग बंद करण्यात आला आहे. शाही ईदगाह येथे सकाळी लाडू गोपाळांचा जलाभिषेक करण्यासाठी आलेला हिंदू महासभेचा कार्यकर्ता सौरभ शर्मा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्याने दिली आत्महत्येची धमकी
राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश शर्मा यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. ज्यामध्ये त्याला हनुमान चालीसा वाचण्यापासून रोखले तर आत्महत्या करेल असे म्हटले आहे. सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा राजश्री चौधरी मथुरेत पोहोचल्या आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पणतू आणि महासभेच्या अध्यक्षा राजश्री चौधरी या 16 नोव्हेंबरला वाराणसीला गेल्या होत्या. त्यांनी 6 डिसेंबर रोजी श्री कृष्ण जन्मस्थळी मथुरा चलोचा नारा दिला. शाही ईदगाहला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान असल्याचे सांगून हनुमान चालीसा पठण आणि गोपाळाचा जलाभिषेक करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व हिंदू नेत्यांना मथुरेत पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले.
रात्री काढला फ्लॅग मार्च
सोमवारी संध्याकाळी मथुरामध्ये सीओ सिटी आणि एसएसपी शैलेश पांडे यांनी रात्री फोर्ससह फ्लॅग मार्च काढला. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवण्यास पोलिस कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आहे. जर कोणी संशयित वाटत असेल तर त्याची चौकशी करा. श्री कृष्ण जन्मस्थान आणि शाही ईदगाहच्या आजूबाजूचा परिसर 2 सुपर झोन, 4 झोन आणि 8 सेक्टरमध्ये विभागला गेला आहे.
आग्रा झोनचे सुमारे 1260 पोलिस येथे तैनात करण्यात आले आहेत. फिरोजाबाद, मैनपुरी, अलीगढ आणि आग्रा येथून फौजफाटा मागवण्यात आला आहे. 2 कंपनी पीएसी आणि गुप्तचर यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. संवेदनशील भागात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येत आहे.
एसएसपी शैलेश पांडे यांनी सांगितले की, परवानगीशिवाय कोणताही कार्यक्रम होऊ देणार नाही.
राम मंदिर-बाबरी मशीद वाद 2019 मध्ये थांबला
अडीच वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येतील बाबरी मशीद आणि राम मंदिराचा वाद संपला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या वादात 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात राम मंदिराच्या उभारणीसाठी 2.77 एकरची वादग्रस्त जमीन हिंदू पक्षाला देण्याचा निर्णय घेतला. 1528 मध्ये येथे बांधलेली बाबरी मशीद 1992 मध्ये कारसेवकांनी पाडली होती. उत्तर प्रदेशच्या अयोध्यामधील बाबरी मशिदीची निर्मिती मोगल बादशहा बाबरचा जनरल मीर बाकी यांनी केली होती. अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक दस्तांवेजांनुसार ही मशीद रामाचे जन्म स्थळ असलेल्या मंदिरावर बांधली गेली होती. त्यामुळे ही मशीद कारसेवकांनी 6 डिसेंबर 1992 रोजी जमिनोदोस्त केली.
देशातील 5 राज्यांतही या 10 मशिदींवरून वाद
मंदिर-मशीद वाद भारतात नवीन नाही. यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती राम मंदिर-बाबरी मशीद वादाची, जी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 2019 मध्ये थांबली होती. अशा परिस्थितीत जाणून घेऊया की देशात अजूनही मंदिर-मशिदीशी संबंधित कोणते 10 वाद आहेत? या वादांचे कारण काय आणि मागणी काय? या मशिदींचा इतिहास काय आहे? वादग्रस्त मशिदींचा उल्लेख केला तर त्यात अयोध्येतील बाबरी मशीद, मथुरेतील ईदगाह मशीद, वाराणसीतील ज्ञानवापी मशीद, जौनपूरमधील अटाला मशीद, पाटण, गुजरातमधील जामी मशीद, अहमदाबादमधील जामा मशीद, पांडुआ, पश्चिम बंगालमधील आदिना मस्जिद, मध्य प्रदेशातील विदिशा येथील बीजा मंडल मशीद आणि दिल्लीतील कुव्वत-उल-इस्लाम मशीद यांचा समावेश आहे. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.