आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Babri Masjid Demolition Case Verdict Political Reactions Update: LK Advani, Murli Manohar Joshi To From Uma Bharti

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राम मंदिरावर 57 दिवसांनंतर बोलले आडवाणी:निर्दोष मुक्तता झाल्यानंतर भाजपचे सारथी म्हणाले - जय श्रीराम! या निर्णयाने मंदिर आंदोलनातील माझे समर्पण सिद्ध झाले

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील लाखो लोकांप्रमाणे मी देखील आयोध्येत सुंदर राम मंदिर पाहू इच्छितो - लालकृष्ण आडवाणी

बाबरी विध्वंस केसमध्ये स्पेशल सीबीआय कोर्टाने बुधवारी लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशींसह सर्वच 32 आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय दिला. निर्णयानंतर लालकृष्ण आडवाणी (92) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, कोर्टाच्या निर्णयाने माझी आणि पार्टीची रामजन्मभूमी आंदोलनाविषयी प्रतिबद्धता आणि समर्पण सिद्ध झाले. निर्णय आल्यानंतर आडवाणी यांनी जय श्रीरामचा नाराही दिला.

यापूर्वी, 4 ऑगस्टला राम मंदिरावर त्यांनी वक्तव्य केले होते. आडवाणी यांनी राज जन्मभूमी पूजनाच्या एक दिवसपूर्वी म्हटले होते की, जीवनातील काही स्वप्न पूर्ण होण्यास खूप उशीर लागतो, पण पूर्ण झाल्यावर असे वाटते की, प्रतिक्षा सार्थ झाली.

मुलगी प्रतिभासोबत टीव्हीवर कोर्टाची कारवाई पाहत असलेले लालकृष्ण आडवाणी
मुलगी प्रतिभासोबत टीव्हीवर कोर्टाची कारवाई पाहत असलेले लालकृष्ण आडवाणी

भाजपाचे वरिष्ठ नेता असेही म्हणाले की, आज जो निर्णय आला आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आम्हा सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. वृत्त ऐकले, याचे स्वागत करतो. देशातील लाखो लोकांप्रमाणे मी देखील आयोध्येत सुंदर राम मंदिर पाहू इच्छितो.

अयोध्येत कोणताही कट रचला गेला नाही
मुरली मनोहर जोशींनी म्हटले की, कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सिद्ध झाले की, 6 डिसेंबर 1992 ला अयोध्येत कोणताही कट रचला नव्हता. तेव्हा आमचा कार्यक्रम आणि रॅली कोणत्याही षड्यंत्राचा भाग नव्हते. आम्ही आनंदी आहोत. सर्वांनी राम मंदिर निर्माणाविषयी उत्साहित व्हायला हवे.

मुरली मनोहर जोशी यांनी व्हिडिओ कॉन्फरेसिंगच्या माध्यमातून कोर्टात हजेरी लावली
मुरली मनोहर जोशी यांनी व्हिडिओ कॉन्फरेसिंगच्या माध्यमातून कोर्टात हजेरी लावली
Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser