आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछप्पर फाडून मिळते ते असे. ४३ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या ३,५०० शेअर्सचा केरळच्या काेची येथील बाबू जॉर्ज वालावी यांना विसर पडला. आता त्याची किंमत १,४४८ काेटी रुपये आहे. पण कंपनीला आता त्यांचे पैसे द्यायचे नाहीत. ७४ वर्षांचे बाबू आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी हे प्रकरण सेबी कडे नेले आहे. ते कंपनीच्या शेअर्सचे खरे मालक आहेत आणि कंपनी त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्याला सेबीकडून नक्कीच न्याय मिळेल, अशी आशा बाबू व्यक्त करत आहेत.
दावा- कंपनी नाेंदणीकृत नव्हती, लाभांश देत नव्हती..
बाबू यांनी १९७८ मध्ये मेवाड आॅइल अँड जनरल मिल्स लिमिटेडचे ३,५०० समभाग खरेदी केले हाेते. त्या वेळी ही राजस्थानच्या उदयपूरमधील एक अनाेंदणीकृत कंपनी हाेती. बाबू २.८ % भागधारक बनले. कंपनीचे संस्थापक अध्यक्ष पी. पी. सिंघल व बाबू मित्र होते. कंपनी नाेंदणीकृत नव्हती व कोणताही लाभांश देत नव्हती त्यामुळे या कुटुंबाला या गुंतवणुकीचा विसर पडला. २०१५ मध्ये त्यांना या गुंतवणुकीची आठवण झाली व त्यांची चाैकशी केली असता त्यांना कळले की कंपनीने आपले नाव बदलून पीआय इंडस्ट्रीज केले आहे व ती सूचीबद्ध झाली. बाबूने शेअर्स डीमॅट खात्यात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत एका एजन्सीशी संपर्क साधला. तिने बाबूला कंपनीशी संपर्क करण्यास सांगितले. कंपनीने बाबूंना सांगितले की ते कंपनीचा हिस्सेदार नाहीत व त्यांच्या शेअर्सची १९८९ मध्ये अन्य काेणाला तरी विक्री केली.
कंपनीचा तपास, सर्व दस्तएेवज खरे असल्याचे मानले
पीआय इंडस्ट्रीजने बनावट शेअर्सचा वापर करून त्याचे शेअर्स दुसऱ्याला बेकायदेशीरपणे विकण्यात आल्याचा आराेप बाबू यांनी केला आहे. २०१६ मध्ये पीआय इंडस्ट्रीजने बाबूला मध्यस्थीसाठी दिल्लीला बोलावले, पण बाबूने नकार दिला. नंतर कंपनीने बाबूच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना केरळला पाठवले. बाबूसोबत असलेली कागदपत्रे खरी असल्याचे कंपनीने मान्य केले, पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.बाबूने सेबीकडे तक्रार केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.