आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरुवरून जयपुरकडे येताना इंडिगोच्या फ्लाइटमध्ये बुधवारी एका महिलेने बाळाला जन्म दिला. विमानात असलेल्या एका महिला डॉक्टराने इंडिगोच्या क्रू मेंबर्सच्या मदतीने यशस्वी डिलीव्हरी केली. बाळ आणि महिला सुरक्षित आहेत.
सकाळी 8 वाजता येणार होते विमान
एअरलाइनने सांगितल्यानुसार, इंडिगोची फ्लाइट क्र. 6E-469 ने सकाळी 5:45 वाजता बंगळुरुवरून उड्डाण घेतली. ही फ्लाइट 8 वाजता जयपूरला येणार होती. सीट नंबर 2A वर बसलेल्या ललिता नावाच्या महिलेला विमानात अचानक लेबर पेन सुरू झाले. विमानातील क्रू मेंबर्संनी विमानात कुणी डॉक्टर आहे का, अशी विचारणा केली. यानंतर विमानत सीट नंबर 10C वर महिला डॉक्टर सुबहाना नजीर होत्या. डॉ. नजीरने क्रु मेंबरच्या मदतीने विमानात यशस्वी डिलीव्हरी केली. यादरम्यान, क्रू मेंबर्सनी जयपूर एअरपोर्ट अथॉरिटीला याची माहिती दिली. यानंतर विमान तळावर डॉक्टर आणि अँबुलंसची व्यवस्था करण्यात आली. सध्या महिला आणि बाळाला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.