आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईलगत असलेल्या पालघर परिसरात काही लोकांनी धावत्या कारमध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे तिच्या 10 महिन्यांच्या चिमुरडीला कारमधील लोकांनी बाहेर फेकून दिल्याने तिला वाचविण्यासाठी त्या महिलेने कारमधून उडी मारली. यात ती महिला गंभीर जखमी झाली आहे. त्या चिमुरडीचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घडली.
पोलिसांनी सांगितले- पीडिता पुन्हा-पुन्हा स्टेटमेंट बदलते
या घटनेची तक्रार पालघर येथील मांडवी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी कार चालक विजय कुशवाहाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला वारंवार आपले म्हणणे बदलत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांनी तीन वेळा विधान बदलले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज असून पोलिस घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीचीही तपासणी करत आहे.
महिला आरोपींना ओळखत नाही
पीडितेने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे- "माझ्या मागे बसलेला माणूस मला इकडे-तिकडे स्पर्श करत होता. मी विरोध केल्यावर त्याने मुलीला माझ्या हातातून हिसकावून बाहेर फेकले. तिला वाचवण्यासाठी मी उडी मारली. मला माहीत नाही. माझ्या मुलीला कोणी बाहेर फेकले. कारच्या मागे 3 लोक बसले होते. ते कोण होते त्याची माहिती मला नव्हती.
महिला गाडीत का बसली होती?
पालघर परिसरातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावर लिफ्ट घेऊन प्रवास करणे हे सामान्य बाब आहे. रोज लोक या भागात ये-जा करण्यासाठी खासगी कारमध्ये बसतात. ही महिलाही कारमध्ये इतर महिलांसोबत बसली होती. नंतर अन्य महिला वाटेत उतरल्या. ही घटना घडली तेव्हा महिला कारमध्ये एकटीच होती. महिलेचा आरोप आहे की, आरोपीने तिच्या मुलीला चालत्या कारमधून फेकले. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. तर महिला स्वतः गंभीर जखमी झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.