आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Baglore | Positive News | Survived Child Marriage Itself, Then Stopped Hundreds Of Child Marriages In Villages; Ashwini Is Working To Create Awareness In Remote Villages

सकारात्मक बातमी:स्वतः बालविवाहाला बळी पडताना वाचली, मग गावागावात रोखले शेकडो बालविवाह; दुर्गम खेड्यांमध्ये जनजागृतीचे काम करत आहे अश्विनी

बंगळुरू10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूनिसेफच्या मते, भारतात दरवर्षी १५ लाख मुलींचे बालविवाह होतात. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोनुसार, बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत गेल्या वर्षी ७८५ प्रकरणे नोंदवण्यात आली होती. कुटुंबीयांसमोर खंबीरपणे उभी राहिली नसती तर अशीच अश्विनी दोडलिंगपूरची कहाणी कुठे तरी विस्मृतीत गेली असती.

कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातील कुरुगोविनाकोप्पा गावातील अश्विनी १५ वर्षांची असताना तिच्या कुटुंबीयांनी तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकला. अश्विनीने केवळ विरोधच केला नाही, तर आता तिने गावातील शेकडो बालविवाह थांबवले आहेत. जागरूकतेने बदलाचे प्रतीक बनलेल्या अश्विनीच्या कथेचा लिनोव्होने १० देशांतील १० प्रेरणादायी तरुणींच्या कथेत समावेश केला आहे.

अश्विनी सांगते की, तिच्या एका मैत्रिणीचे वयाच्या १२व्या वर्षी लग्न झाले. त्या वेळी ती काहीच करू शकत नव्हती. पण मनात एक सल राहिला. ती सांगते की, तिच्या गावात जुन्या रूढीवादी परंपरा अजूनही कायम आहेत. अश्विनीच्या पालकांनाही मुलींच्या शिक्षणावर खर्च करणे म्हणजे पैशाची उधळपट्टी, असे वाटत होते. शालेय शिक्षणानंतर तिने मोठ्या कष्टाने बीए पूर्ण केले.

खिशात फक्त ५ हजार रुपये घेऊन ती बंगळुरूला आली आणि देशपांडे फाउंडेशनच्या सहकार्याने व्यावसायिक प्रशिक्षण घेतले. त्यानंतर मेघशाळा फाउंडेशनमध्ये नोकरीला सुरुवात केली. मेघशाळासोबतच अश्विनीने कर्नाटकातील दुर्गम गावांमध्ये जाऊन सरकारी शाळेतील शिक्षकांना कोविडच्या काळात ऑनलाइन शिकवण्याचे प्रशिक्षण दिले. तिला शिकवणाऱ्या शिक्षकांनाही मोबाइलचा वापर शिकवला. अश्विनी सांगते की, पूर्वी ज्या गावात मोबाइलवर काही पाहणे निषिद्ध मानले जायचे, तिथे आता लोक हा बदल स्वीकारत आहेत आणि तिच्याकडे आदराने पाहतात. तिच्या गावातील इतर मुलींना आता तिच्याकडून प्रेरणा मिळत आहे.

१० देशांतील १० तरुणींमध्ये समावेश
अश्विनीचे हे छायाचित्र बदलाची कहाणी सांगते. गावातल्या लोकांना तंत्रज्ञानाची ओळख करून देणाऱ्या अश्विनीकडे पाहून लोक मोबाइलशी मैत्री करू लागले आहेत. अश्विनीची कथा लिनोव्होने आपल्या ‘न्यू रिअॅलिटीज’ या मालिकेत चित्रित केली आहे.

त्यात १० देशांतील १० तरुणींचा समावेश आहे. अश्विनीच्या कथेचे शूटिंग करताना कोरोनाचे बंधन लागू होते. अशा स्थितीत शूटिंग टीम गावात पोहोचू शकली नाही. अश्विनीने ३६० अंश कॅमेऱ्याने स्वत:चे चित्रीकरणही केले. मेघशाळामध्ये काम करणारी अश्विनी सध्या बंगळुरूमधील शाळांमध्ये शिक्षकांना प्रशिक्षण देत आहे.

अश्विनी सांगते की, तिच्या एका मैत्रिणीचे वयाच्या १२व्या वर्षी लग्न झाले. त्या वेळी ती काहीच करू शकत नव्हती. पण मनात एक सल राहिला. ती सांगते की, तिच्या गावात जुन्या रूढीवादी परंपरा अजूनही कायम आहेत. अश्विनीच्या पालकांनाही मुलींच्या शिक्षणावर खर्च करणे म्हणजे पैशाची उधळपट्टी, असे वाटत होते.

शालेय शिक्षणानंतर तिने मोठ्या कष्टाने बीए पूर्ण केले. खिशात फक्त ५ हजार रुपये घेऊन ती बंगळुरूला आली आणि देशपांडे फाउंडेशनच्या सहकार्याने व्यावसायिक प्रशिक्षण घेतले. त्यानंतर मेघशाळा फाउंडेशनमध्ये नोकरीला सुरुवात केली.

मेघशाळासोबतच अश्विनीने कर्नाटकातील दुर्गम गावांमध्ये जाऊन सरकारी शाळेतील शिक्षकांना कोविडच्या काळात ऑनलाइन शिकवण्याचे प्रशिक्षण दिले. तिला शिकवणाऱ्या शिक्षकांनाही मोबाइलचा वापर शिकवला. अश्विनी सांगते की, पूर्वी ज्या गावात मोबाइलवर काही पाहणे निषिद्ध मानले जायचे, तिथे आता लोक हा बदल स्वीकारत आहेत आणि तिच्याकडे आदराने पाहतात. तिच्या गावातील इतर मुलींना आता तिच्याकडून प्रेरणा मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...