आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरात सरकारच्या तीव्र विरोधानंतरही सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी गोध्रा हत्याकांडातील दोषी फारुकला जामीन मंजूर केला. जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्ध त्याचे अपील २०१८ पासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होते. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिंहा यांच्या खंडपीठाने सांगितले की, फारुख २००४ पासून तुरुंगात आहे. त्याने १७ वर्ष तुरुंगात काढली, त्यामुळे त्याला जामीन देण्यात यावा.
गुजरात सरकारची बाजू- दगडफेक सामान्य नव्हे, जळत्या बोगीतून कुणीही बाहेर पडू शकले नाही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, दगडफेक करणाऱ्यांचा हेतू असा होता की जळत्या बोगीतून कोणीही प्रवासी बाहेर पडू शकणार नाही आणि बाहेरून कोणीही त्यांना वाचवायला जाऊ शकणार नाही. सामान्य परिस्थितीत दगडफेक हा कमी गंभीर गुन्हा असू शकतो, परंतु हे वेगळे आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, यातील काही दोषी दगडफेक करणारे होते आणि त्यांनी बराच काळ तुरुंगात काढला आहे. अशा स्थितीत काहींची जामिनावर सुटका होऊ शकते. सुनावणीदरम्यान, सॉलिसिटर जनरल यांना न्यायालयाकडून ग्वाही देण्यात आली की न्यायालय प्रत्येक दोषीच्या भूमिकेची तपासणी करेल आणि काहींना जामिनावर सोडता येईल का यावर विचार करेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.