आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यमंत्री बच्चू कडू यांना अकोला न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अकोला येथील रस्ताच्या कामात 2 कोटीचा गैरव्यवहार प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने तक्रार दिली होती. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज या प्रकरणी त्यांना अकोला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
काय आहे प्रकरण?
अकोला जिल्हा परिषदेने नियोजन समितीकडे पाठवलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावांत परस्पर बदल करून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर नियोजन समिती अध्यक्ष या नात्याने पालकमंत्री बच्चू कडू यांनी 1 कोटी 95 लाखांच्या निधीचा अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीने पोलिसांत दिली होती. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करावा, असा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले होते.
जिल्हा नियोजन समितीने वार्षिक आराखडा तयार करताना जि.प.कडून ग्रामीण रस्ते दुरुस्ती, नवी कामे, पुलासाठी प्रस्ताव मागितले होते. त्यानुसार 10 मार्च 2021 रोजी झालेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन प्रस्ताव समितीकडे पाठवण्यात आला. मात्र, शासनाच्या लेखी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर समितीचे अध्यक्ष या नात्याने कडू यांनी यंत्रणांचा गैरवापर करून निधी वळवला, असा आरोप होता.
शासनाच्या 1कोटी 95 लाखांचा निधीचा अपहार करण्याच्या उद्देशाने बोगस कागदपत्रे तयार केली, असा आरोप ‘वंचित’ने केला होता. याप्रकरणी पोलिसांनी दखल घेतली नाही. त्यामुळे ‘वंचित’तर्फे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी बच्चू कडूंविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता 156 (3) अंतर्गत प्रकरण न्यायालयात दाखल केले. डॉ. पुंडकर यांच्या वतीने अॅड. आशीष देशमुख यांनी कामकाज पाहिले होते.
बच्चू कडूंचा दुसऱ्यांदा अटकपूर्व जामीन मंजूर
पालकमंत्री बच्चू कडू यांनी 28 एप्रिल रोजी जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांना 9 मे पर्यंत जामीन मंजूर देखील झाला होता. या नंतर त्यांनी पुन्हरा न्यायालयात अटकपूर्व जामरन मिळावा यासाठी अर्ज केला होता. यावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने कडू यांचा जामीन अर्ज आज मंजूर केल्याने त्यांना या प्रकरणात दुसऱ्यांदा जामीन मंजूर झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.