आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य प्रदेशाच्या सिवनीत मंगळवारी मॉब लिंचिंगची एक गंभीर घटना घडली आहे. यात गोमांसाची तस्करी केल्याच्या संशयावरुन 3 आदिवसांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम केला आहे.
प्रकरण कुरई पोलिस ठाण्यांतर्गत बादल पार चौकी क्षेत्रातील आहे. हत्या व चक्काजामची माहिती मिळताच पोलिस दल घटनास्थळी पोहोचले. कुरईच्या गाव सागर व सिमरिया गावच्या धानशाह (54) व संपत बट्टी (60) यांच्यावर काही तरुणांनी लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढवला. मृतांच्या नातेवाईकांनी हत्या करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला आहे. या घटनेची माहिती मिळताच बरघाटचे काँग्रेस आमदार अर्जुन सिंह काकोडिया यांनी तातडीने कुरईला धाव घेतली. त्यांनी संतप्त गावकऱ्यांसोबत महामार्गावर निदर्शने केली. आमदारांनीही या घटनेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
घटनास्थळी 12 किलो मांस आढळले
कुरई ठाण्याचे अंमलदार गणपत सिंह उइके यांनी घटनास्थळी जवळपास 12 किलो मांस आढळल्याचे स्पष्ट केले आहे. हे मांस तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.कमलनाथांची 3 आमदारांची समिती
मध्य प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी 2 आदिवासींची हत्या अत्यंत दुखद गोष्ट असल्याचे म्हटले आहे. त्यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन 3 आमदारांची समिती स्थापन केली आहे. ही समिती घटनास्थळी जाऊन पीडित कुटूंबांची भेट घेऊन त्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर करतील. या समितीत आमदार ओंकार सिंह मरकाम, अशोक मर्सकोले, नारायण पट्टा यांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.