आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bajrang Dal Activists Vandalize Prakash Jha During Filming Of 'Ashram 3' Web Series

भोपाळ:‘आश्रम-३’ वेब सिरीज चित्रीकरणावेळी बजरंग दल कार्यकर्त्यांकडून तोडफोड, प्रकाश झा यांच्यावर शाई फेकली

भोपाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘आश्रम-३’ या वेब सिरीजच्या चित्रीकरणादरम्यान रविवारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. प्रकाश झा यांच्यावर शाई फेकण्यात आली. कार्यकर्त्यांनी युनिटच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. व्हॅनिटी व्हॅनसह पाच वाहनांची तोडफोड करण्यात आली. माध्यमांचे अनेक प्रतिनिधीही जखमी झाले. कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी बळाचा सौम्य वापर केला.

बजरंग दलाचे प्रांत संयोजक सुशील सुडेले म्हणाले की, सरकारने पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी येथे चित्रीकरणास परवानगी दिली आहे. हिंदू समाजाला अपमानित करण्यासाठी नाही. वेब सिरीजची पटकथा आणि नाव हिंदू समाजाला बदमान करणारे आहे. जोपर्यंत ते बदलत नाही तोपर्यंत विरोध सुरूच राहील. पोलिस उपमहानिरीक्षक इरशाद वली म्हणाले की, अभिनेता बाॅबी देओल, प्रकाश झा यांच्याकडून घटनेची माहिती घेतली आहे. उपद्रवींंनी काही वाहनाचे नुकसान केले. तक्रारीनंतर त्यांची ओळख पटवून कारवाई करू. तथापि, प्रकाश झा यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...