आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुधवारी दिल्लीच्या मंगोलपुरी भागात एका युवकाला चाकूने ठार मारण्यात आले. आता या प्रकरणात वेगवेगळे दावे केले जात आहेत. या मुलाच्या आईने दावा केला आहे की, त्यांचा मुलगा जय श्री रामची घोषणा देत होता म्हणून त्याचा खून करण्यात आला. तर पोलिसांचा असा दावा आहे की मृतक आणि आरोपी मित्र होते. वाढदिवसाच्या पार्टीत त्याचे भांडण झाले होते. घटनेला जातीय रंग देऊ नये.
रिंकू शर्मा असे मृताचे नाव आहे. तो बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. रिंकूच्या कुटुंबियांचा असा दावा आहे की रिंकूने यापूर्वी मागील वर्षी 5 ऑगस्ट रोजी या भागात श्री राम रॅली आयोजित केली होती. त्यानंतरही आरोपीच्या वतीने आक्षेप घेण्यात आला होता.
चार आरोपींना करण्यात आली अटक
पोलिसांनी म्हटले की, रिंकू आपल्या मित्रांसोबत वाढदिवसाच्या पार्टीमध्ये गेला होता. येथे मित्रांसोबत त्याचे भांडण झाले. घरी परत येत असताना चाकू मारुन त्याची हत्या करण्यात आली. आउटर दिल्ली पोलिस DCP एक कोन यांचे म्हणणे आहे की, सर्व लोक एकाच परिसरात राहणारे आहेत आणि एकमेकांना ओळखत होते. चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांची नावे जाहिद, मेहताब, दानिश आणि इस्लाम आहे.
ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
या घटनेला जातीय रंग दिला जात असल्याने प्रकरण जास्त व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर #JusticeForRinkuSharma #HindusLivesMatter ट्रेडिंगमध्ये आहे. अभिनेत्री कंगना रनोटने एका यूजरची पोस्ट री-पोस्ट करत लिहिले आहे की, ‘सॉरी, हम नाकाम हुए।’
कंगनाने एक दुसरी पोस्ट री-पोस्ट करत लिहिले आहे की, 'त्याच्या वडिलांच्या दुःखाची जाणीव करा आणि आपल्या मुलांच्या किंवा कुटुंबातील सदस्यांविषयी विचार करा. एका हिंदूची केवळ जय श्रीराम म्हटल्यामुळे लिंचिंग करण्यात आली.'
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.