आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bajwa's Wealth Rose From 76 To 457 Crores In 6 Years, 20 Large Plots In Pakistan, Property Purchase In America

पाक जनरल अडचणीत:बाजवांंची संपत्ती 6 वर्षांत 76 वरून 457 कोटींवर पोहोचली, पाकमध्ये 20 मोठे भूखंड, अमेरिकेत मालमत्ता खरेदी

इस्लामाबाद/ नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा निवृत्तीच्या ८ दिवस आधी मालमत्तेसंबंधी कागदपत्रे उघड झाल्याचे गौप्यस्फोटाने घेरले गेले आहेत. बाजवा यांच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांची संपत्ती सहा पटीने वाढवली. बाजवा यांची संपत्ती अंदाजे १३ अब्ज रुपये (भारतीय चलनात ४५७ कोटी) इतकी आहे.

अमेरिकेत निर्वासित असलेले पाकिस्तानी पत्रकार अहमद नूरानी यांच्या ‘फॅक्ट फोकस’ या संस्थेने कागदोपत्री पुराव्यासह ही माहिती उघड केली आहे. पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने सोमवारी संध्याकाळी उशिरा या कागदपत्र फुटीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. कार्यकाळात बाजवा यांनी पत्नी आयेशा अमजद आणि सून महनूर साबीर यांच्या नावावर सर्वाधिक संपत्ती जमा केली. बाजवा कुटुंबाने लाहोर, इस्लामाबाद, कराची आणि रावळपिंडी येथे सुमारे २० मोठे भूखंड खरेदी केले. तसेच अमेरिकेसह इतर देशांतील मालमत्तेत गुंतवणूक केली.

नवीन लष्करप्रमुखासाठी पाच नावे नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्तीसाठी संरक्षण मंत्रालयाने सोमवारी असीम मुनीर, साहिर शमशाद मिर्झा, अझहर अब्बास, नोमान मेहमूद आणि फैज हमीद यांची नावे पाठवली आहेत. त्यापैकी फैज हमीद हे इम्रान गटातील मानले जातात.

पत्नी आयेशाच्या नावे तेल व्यवसाय बाजवा यांनी पत्नी आयेशाच्या नावाने दुबईत मुख्य तेल कंपनी उघडली. आयेशाच्या नावावर अमेरिकेतील एका बँकेत ४१ कोटी रुपये जमा आहेत.

सुनेची संपत्ती शून्यावरून २४८ कोटी ऑक्टोबर २०१८ मध्ये माहनूर साबीरची संपत्ती शून्य होती. २ नोव्हेंबर २०१८ रोजी साबीरची संपत्ती बाजवांचा पुत्र सिद्दीकशी लग्न होताच २४८ कोटी झाली.

एक्‍सपर्ट / सुशांत सरीन, वरिष्ठ संशाेधक, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन या गाैप्यस्फाेटाने वेळ साधली, पाक लष्कराची प्रतिमा धुळीला

{बाजवा यांच्या मालमत्तेबाबत गाैप्यस्फाेटाचा काय परिणाम होईल?? गाैप्यस्फाेटाची वेळ महत्त्वाची आहे. बाजवा २९ नाेव्हेंबरला निवृत्त होत आहेत. इम्रान यांचा लष्कराविरोधात लाँग मार्च सुरू आहे. त्यामुळे लष्कराची प्रतिमा खराब झाली आहे. {इम्रान खान यांना फायदा मिळू शकेल का? तात्काळ लाभ मिळू शकतो. लष्करात अस्वस्थता आहे. पण, बाजवा यांचे नाव न घेता इम्रान कसा फायदा घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. {बाजवा यांच्या या प्रकरणाला पाक लष्कर कसे सामोरे जाईल? वास्तविक, पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनीच मालमत्तांचे व्यवहार केलेले आहेत. नव्या खुलाशांनंतर प्रतिमा वाचवण्यासाठी आणि बाजवांचं हे प्रकरण दडपण्यासाठी लष्कर आपली पूर्ण ताकद पणाला लावून पंतप्रधान शाहबाज यांच्यावर दबाव आणणार आहे.

बातम्या आणखी आहेत...