आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:निर्बंधांतून बकरी ईदला सूट; कोर्टाने केरळला मागितले उत्तर

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळ सरकारने बकरी ईदला कोरोनाशी संबंधित निर्बंधांत सूट दिल्याचे प्रकरण सुप्रीम काेर्टात गेले आहे. कोर्टाने याबाबत राज्य सरकारकडून त्वरित उत्तर मागवले आहे.

सुनावणीत संबंधित याचिकेवर उत्तर दाखल करायचे असल्याचे केरळ सरकारच्या वकिलांनी कोर्टात सांगितले. कोर्टाने परवानगी देत एक दिवसाची मुदत दिली. यानंतर मंगळवारी सकाळी सर्वात आधी याच प्रकरणात सुनावणी होणार असल्याचे सांगितले. याचिकेत म्हटले आहे की, केरळ सरकारने वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करून ही सूट दिली आहे. राज्यात अजूनही अनेक ठिकाणी कोरोना संसर्गाचे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे तरीही एक समुदाय व व्यापाऱ्यांच्या दबावात निर्बंधांत सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २१ जुलैला बकरी ईद आहे. सरकारने १८ ते २० जुलैपर्यंत बाजारात खरेदीचे निर्बंध शिथिल केले आहेत.

कावड यात्रेला बंदी, तर बकरी ईदला सूट का?
केरळ सरकारच्या निर्णयाला भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद आदींनी विरोध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाशी संबंधित धोक्यांच्या आधारे श्रावणात निघणाऱ्या कावड यात्रेवर बंदी घातली आहे. अशात बकरी ईदला केरळ सरकार कशी सूट देऊ शकते, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे.