आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Balasaheb Thorat, 22 Congress MLAs Complain To Sonia Against Ashok Chavan | Marathi News

काँग्रेसचे 22 नाराज आमदार:बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाणांविरोधात काँग्रेसच्या 22 आमदारांची सोनियांकडे तक्रार, काँग्रेस अध्यक्षा म्हणाल्या- लेखी तक्रार द्या

औरंगाबाद, दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपासून नाराज असलेल्या राज्यातील काँग्रेसच्या २२ आमदारांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मंगळवारी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेत ३५ मिनिटे चर्चा केली. या वेळी आमदारांनी पक्षातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्याविरोधात तक्रार केली. उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारांची कामे करतात. मात्र, चव्हाण आणि थाेरात यांचे आपल्याच पक्षातील आमदारांकडे दुर्लक्ष असल्याचे त्यांनी गांधी यांना लक्षात आणून देत संवादाचा अभाव असल्याचे म्हटले. त्यावर सोनिया गांधी यांनी आपल्याकडे लेखी तक्रार करण्याची सूचना सर्व आमदारांना केली. या शिष्टमंडळात विकास ठाकरे, संग्राम थोपटे यांच्यासह राजेश राठोड यांचाही समावेश होता.

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे असल्याने त्याच्या निवडीबाबत निर्णय होत नसल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. तसेच काँग्रेसला आणखी बळकट करण्यासाठी नेत्यांना बळ द्यावे, अशी मागणीही केली. दिल्लीत सर्वपक्षीय आमदारांचे प्रशिक्षण सुरू आहे. त्यानिमित्ताने त्यांनी सोनियांची भेट घेतली.

या वेळी आमदार प्रज्ञा सातव, सुरेश वरपुडकर, कैलास गोरंट्याल, अमर राजूरकर उपस्थित होते. दरम्यान, आमदारांनी आपले मुद्दे लेखी स्वरूपात खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे द्यावेत, अशा सूचना सोनियांनी दिल्या. महामंडळाच्या नियुक्त्या वगळता इतर कुठल्याही नियुक्त्या महाविकास आघाडीकडून केल्या जात नसल्याचे विदर्भातील आमदारांनी सांगितले. आता यावर चव्हाण आणि थोरात यांची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे.

बातम्या आणखी आहेत...