आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:लग्न लागतानाच बाल्कनी कोसळली, विधी थांबवले, 12 महिला जखमी, क्षमतेपेक्षा जास्त गर्दीमुळे घडली घटना

गेला4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारच्या गया येथे एका लग्नादरम्यान अपघात झाला. लग्न लावण्यासाठी एका निर्माणाधीन इमारतीच्या बाल्कनीत महिला मोठ्या संख्येने उभ्या होत्या. यादरम्यान अचानक ही बाल्कनी कोसळली. या अपघातात 12 महिला जखमी झाल्या आहेत.

या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. यात मंचावर वधू-वर दिसतात. दोघेही एकमेकांना पुष्पहार घालणार होते. नेमक्या याच वेळी शेजारील निर्माणाधीन इमारतीची बाल्कनी कोसळते. या बाल्कनीत क्षमतेपेक्षा जास्त लोक उभे होते. वधु वर मंचावर असतानाच दुसरीकडे हा अपघात झाला.

हे प्रकरण जिल्ह्यातील इमामगंज ब्लॉकमधील फतेहपूर गावाशी संबंधित आहे. 21 मे रोजी लग्नादरम्यान ही घटना घडली होती. अपघातात जखमी झालेल्या महिलांवर खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बाल्कनी आधीच झुकलेली होती

बांधण्यात येत असलेल्या घराची बाल्कनी अगोदरच कललेली होती, असे सांगितले जात आहे. लग्नाच्या रात्री जास्त वजनामुळे ती जास्त वेळ टिकाव धरू शकली नाही आणि खाली पडली. बाल्कनी पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

येथे व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत फतेहपूर गावातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, इमामगंज ब्लॉकच्या सिरपूर पंचायतीच्या मनियाम्मा गावातून नानू यादव यांच्या घरापर्यंत लग्नाची मिरवणूक आली होती. वरमाळाचा सुरू होत्या. दरम्यान, अचानक छताची बाल्कनी पडली. अपघातानंतर घटनास्थळी घबराट पसरली.

लग्नाचे विधी काही काळ थांबवून नंतर लग्न पार पडले.
लग्नाचे विधी काही काळ थांबवून नंतर लग्न पार पडले.

लग्न काही काळासाठी पुढे ढकलले

या अपघातात रझिया देवी यांच्या पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तर सुमन कुमारी आणि खुशबू कुमारी यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेदरम्यान गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातानंतर लग्नाचे विधी थांबवण्यात आले.

नातेवाईक व ग्रामस्थांच्या मदतीने सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती दिल्यानंतर लग्नाचे विधी पुन्हा सुरू झाले.