आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटनामुळे समस्या:परदेशी कामगारांच्या रात्रभर चालणाऱ्या पार्ट्यांमुळे बालीच्या स्थानिक नागरिकांची चांगलीच झोपमोड

बाली4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडोनेशियातील बालीचे सुंदर समुद्रकिनारे दुर्गम भागात काम करणाऱ्या परदेशींची पसंतीचे ठिकाण ठरले आहे. येथे परदेशातून आलेले लोक किनारपट्टी, डोंगराळ भागातील कॅफे, रेस्तराँमध्ये बसून आरामात काम करतात. काम संपल्यानंतर हे लोक पार्टी करण्यासाठी बाहेर पडतात. त्यांच्या पार्ट्या रात्रभर चालतात. त्यामुळे बालीतील स्थानिक नागरिक सध्या या पर्यटकांना वैतागले आहेत.दक्षिण बालीच्या कंग्गू गावातील ८ हजार नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम चालवून एक याचिका दाखल केली. पार्ट्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे रात्रीची झोपमोड होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पब व बारमधील गोंगाट इतका प्रचंड आहे की त्यामुळे घराच्या खिडक्या हादरू लागतात. भूकंपासारखे वाटू लागते. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, गैरवर्तनाची देखील याचिकेतून तक्रार करण्यात आली आहे. वास्तविक इंडोनेशियन सरकारनेच परदेशी लोकांना पायघड्या घातल्या आहेत. देशात येऊन दुर्गम भागात काम करा, त्यांना सरकार वास्तव्याला येण्यासाठी प्रोत्साहन देते. यातून देशाच्या अर्थव्यवस्थेचे चक्र गतिमान होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. सध्या देशात ३ हजारावर परदेशी नागरिक वास्तव्याला आहेत. कोणताही व्यक्ती बँक खात्यावर १ लाख ३० हजार डॉलर असल्यास इंडोनेशियाच्या सेकंड होम व्हिसासाठी अर्ज करू शकतो. बालीत दहा वर्षे राहू शकतात.

उत्कृष्ट डिजिटल सुविधा, कमी खर्चात वास्तव्य शक्य बालीत डिजिटल सुविधा खूप चांगल्या आहेत. कमी खर्चात वास्तव्य करण्यासाठी उपयुक्त ठिकाण आहे. कागदपत्रांची देखील झंझट नाही. काही महिने राहण्यासाठी टुरिस्ट व्हिसाची देखील गरज नाही. पर्यटकांनी येथील नाइट लाइफही आकर्षित करते.

बातम्या आणखी आहेत...