आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लॉकडाऊन वाढल्याने कोटा येथे कोचिंग क्लासेसमध्ये सुमारे ३५ हजार मुले अडकली आहेत. दरम्यान, राजस्थान सरकारने अनेक विद्यार्थ्यांना घरी परत जाण्याचे पास दिले. परंतु बिहारसह इतर राज्यांनी या विद्यार्थ्यांना सीमेवरच रोखले. कोटा येथे कोरोना बाधितांची संख्या ५० वर गेली असल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांना आम्ही राज्यांत प्रवेश देऊ इच्छित नाही, असे राज्यांनी सांगितले. बिहारने तर राजस्थान सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत केंद्रालाही पत्र दिले आहे. यामध्ये दिलासादायक बाब अशी की, कोटा येथील शिक्षण क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग शिरलेला नाही. कोचिंग क्लासेस व वसतिगृह संचालकांनी मुलांच्या राहण्याची व खाण्यापिण्याची योग्य व्यवस्था केली आहे. परंतु पालकांना त्यांची चिंता वाटते. वसतिगृहात कमी मुले राहिली आहेत. अनेक मजल्यावर केवळ एक -दोन मुले उरली आहेत.
हेल्पलाइनवर वाढले कॉल्स, विद्यार्थी आले तणावाखाली
कोटात अडकलेल्या विद्यार्थ्यांत तणाव वाढतो आहे. येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्यासाठी जिल्हा प्रशासन व कोचिंग क्लासेसनी हेल्पलाइन तयार केल्या आहेत. या क्रमांकावर विद्यार्थी सतत घरी जाण्याचा हट्ट करत आहेत. मंगळवारी #sendusbackhome हॅशटॅग टाॅप ट्रेडिंगवर होता. या हॅशटॅगने ७१ हजार टि्वटस झाले आहेत.
हेल्पलाइन क्रमांकावर आतापर्यंत कोचिंगच्या विद्यार्थ्यांचे दोन हजार कॉल्स आले आहेत. यापैकी बहुतांश जण घरी जाण्यासाठी पास मागणारे होते.
विद्यार्थ्यांना लॉकडाऊनमध्ये घरी जाता येणार नाही
काेचिंगच्या विद्यार्थ्यांना पास जारी केल्यानंतर उद्भवलेल्या वादावर कोटा प्रशासनाने आदेश जारी करून प्रक्रिया थांबवली. पास तयार करवून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना पोलिसांनी परत वसतिगृहाकडे पाठवून दिले. लॉकडाऊन काळात ते जेथे असतील तेथेच त्यांनी राहावे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. पास देण्यासाठी प्रशासनाकडून २० एप्रिल रोजी पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त एल.एन. सोनी यांनी सांगितले, अाता लॉकडाऊन सुरू आहे. पास दिल्यानंतर त्यांच्या राज्यांतही विद्यार्थ्यांना रोखले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्याच अडचणीत वाढ होते आहे. ते पाहता परवानगीची प्रक्रिया बंद केली आहे. २० एप्रिल रोजी पुन्हा आढावा घेतला जाईल. परिस्थिती चांगली असेल तर पास देण्यात येतील.
८ राज्यांतील मुले अडकली, बिहार व उत्तर प्रदेशचे जास्त
सर्व आकडेवारी काेचिंग क्लासेस व जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.