आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ban On Puri Rathyatra, It Is Serious For 10 Lakh People To Come Together, Jagannath Will Forgive Us: Chief Justice

पुरी रथयात्रेवर बंदी:10 लाख लोक एकत्र येणे गंभीर, आम्हाला जगन्नाथ माफ करतील : सरन्यायाधीश

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरीत भगवान जगन्नाथाचा रथ तयार होत आहे.
  • ‘कोरोनाचा संसर्ग सुरू असताना अशा गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ शकत नाही’
Advertisement
Advertisement

ओडिशातील पुरी येथील भगवान जगन्नाथ यांच्या या वर्षी २३ जून रोजी होणाऱ्या रथयात्रेवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. बिगर सरकारी संघटना ओडिशा विकास परिषदेने कोरोनाचा हवाला देत यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

गुरुवारी सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी सांगितले, कोरोना महामारीत १० हजार लोक एकत्र येणेच गंभीर गोष्ट आहे, येथे तर १० लाख लोक जमण्याचा अंदाज आहे. हा चिंतेचा विषय आहे. सार्वजनिक आरोग्य आणि नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन आम्ही हे ठरवले आहे की, यंदा भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेला परवानगी देता येणार नाही. महामारीच्या काळात असे कार्यक्रम होऊ शकत नाहीत. लोकांच्या आरोग्यासाठी रथयात्रेवरील बंदी आवश्यक आहे. आम्ही जे करतोय त्यासाठी भगवान जगन्नाथ आम्हाला माफ करतील. भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेचा कार्यक्रम दहा दिवसांचा असतो.

घरबसल्या अयोध्येत राममंदिराचे दर्शन

अयोध्येत रामजन्मभूमी मंदिराच्या सर्व पाच आरत्या भाविक आता सोशल मीडियाद्वारे पाहू शकतील. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या वतीने फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर आरतीच्या लाइव्ह प्रसारणाची तयारी केली जात आहे. मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांच्यानुसार सकाळी होणारी मंगल आरती तसेच शृंगार, बालभोग, संध्या आरती आणि शयन आरती लाइव्ह प्रसारित केली जाईल. मंदिराची शृंगार प्रक्रियाही लाइव्ह दाखवली जाईल.

Advertisement
0