आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bangal Election, Mamta Didi , BJP's Weekly Worship Among Hindu Refugees, Ground Report From A District Near West Bengal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंगाल निवडणूक:हिंदू निर्वासितांमध्ये भाजपच्या साप्ताहिक पूजेमुळे दीदी संकटात, प. बंगालच्या बांगलादेशलगत जिल्ह्यातून ग्राउंड रिपोर्ट

​​​​​​​कोलकाताहून गंगाप्रसाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनी पूजा, लक्ष्मी पूजेकडे वाढता कल, घोषणांमध्येही देवी-देवता

निवडणुकीच्या घोषणाबाजीत ‘लाल सलाम’पासून ‘माँ-माटी-मानुष’पर्यंतचा प्रवास केलेला पश्चिम बंगाल पहिल्यांदाच निवडणुकीआधी धर्म आणि जातीच्या नावाने विभागलेला दिसत आहे. राज्यात मागासांच्या विकासाबद्दल बोलत सत्तेपर्यंत पोहोचलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला या वेळी त्यांच्याच भाषेत भाजपकडून आव्हान देण्यात आले आहे. निर्वासितांचा एक मोठा गट प्रभावित असलेल्या राज्यातील सामाजिक-धार्मिक व प्रशासकीय मुद्द्यांना भाजपकडून हवा दिली जात आहे. परिवर्तनाचे वारे सर्वाधिक बांगलादेश सीमेलगतचा भाग चौबीस परगणा, उत्तर चौबीस परगणा, नदिया, मुर्शिदाबाद, मालदा, दक्षिण दिनाजपूर, उत्तर दिनाजपूर, जलपाईगुडी, अलीपूरदुआर, कुचबिहारमध्ये वाहताना दिसतात. या जिल्ह्यांतील लहान लहान साप्ताहिक पूजांचा वाढता कल भाजपचा मागासवर्गात प्रभाव वाढत असल्याचे तृणमूलला सांगण्यासाठी पुरेसा आहे. राजकीय विश्लेषकांना वाटते की, आता तृणमूलसाठी भाजप आव्हान झाले आहे. बांगलादेशातून येऊन स्थायिक झालेल्या मतुआ समाजाची संख्या जास्त असलेल्या उत्तर चौबीस परगणा जिल्ह्यात हे आव्हान स्पष्ट जाणवते. हा समाज दलित-अति मागास वर्गात गणला जातो. राज्यातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत त्याचे प्रमाण मोठे आहे. समाजवादी चळवळ, विशेषत: पश्चिम बंगालमधील दलित चळवळीशी संबंधित वरिष्ठ विधिज्ञ रामजित राम सांगतात, राज्यातील अशा समाजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हळूहळू आपले स्थान मजबूत केले आहे. या समाजात निवडणुकीआधी सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उठबस स्पष्ट संकेत आहेत. हिंदू निर्वासितांमधील या समाजाच्या बळावर राज्यात भाजप नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) हवा देत आहे. सीमेलगतच्या जिल्ह्यांत सामाजिक मुद्द्यांवरून सांस्कृतिक आंदोलन करणारी संघटना विज्ञान दरबारचे सरचिटणीस शुभमय विश्वास यांचे म्हणणे आहे की, थेट तृणमूलशी संघर्ष वाढेल असे मुद्दे भाजप सतत उचलत आहे. हा संघर्ष जेवढा वाढेल तेवढाच भाजपला लाभ होईल. केंद्राच्या असहकार्यामुळे राज्यात पुरेसा विकास झाला नसल्याचे सांगत तृणमूल या मुद्द्यांना उत्तर देत आहे. मात्र, तरीही वंचित समाजाला सोबत आणण्याच्या भाजपच्या रणनीतीला पक्ष अद्याप पर्याय शोधू शकलेला नाही. राजकीय- प्रशासकीय मुद्द्यांद्वारे विशेष वर्गात आपले स्थान मजबूत करण्याच्या धोरणामुळेच भाजपला लाेकसभा निवडणुकीत राज्यातील ४२ पैकी १८ जागा जिंकता आल्या होत्या.

शनी पूजा, लक्ष्मी पूजेकडे वाढता कल, घोषणांमध्येही देवी-देवता
प. बंगालमध्ये कोलकाता परिसरातील औद्योगिक वा विना औद्योगिक भाग, बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांतील शहरे, गावांमध्ये लहान पूजा वाढल्या आहेत. शनी पूजा, लखी (लक्ष्मी) पूजेसह वेगवेगळ्या पूजा दर आठवड्याला कोणत्या ना कोणत्या दिवशी होत असतात. प्रत्येक पूजेचा दिवस निश्चित आहे. या धार्मिक प्रथेमुळे लोक संघ किंवा भाजपच्या जवळ आले आहेत.

शनी पूजा, लक्ष्मी पूजेकडे वाढता कल, घोषणांमध्येही देवी-देवता
देशाच्या फाळणीपासूनच बंगालमध्ये निर्वासितांची जय-पराजयात भूमिका
मतुआ समाज फाळणीनंतर बांगलादेशातून आला. २०११ च्या जनगणनेनुसार बंगालमध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या १.८४ कोटी आहे. त्यात मतुआ समाजाचा वाटा ५०% आहे. उत्तर, दक्षिण २४ परगणा, नदिया जिल्ह्यातील सहा लोकसभा मतदारसंघांत त्यांची भूमिका निर्णायक आहे. काही जिल्ह्यांत लोकसंख्या १ कोटीपेक्षा जास्त आहे, २९४ विधानसभा मतदारसंघांपैकी ९० ठिकाणी प्रभाव आहे.

बातम्या आणखी आहेत...