आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरूत सिमेंट मिक्सर कारवर उलटला:माय-लेकीचा मृत्यू, ट्रकचे संतुलन बिघडल्याने अपघात; मुलीला शाळेत सोडायला जात होती महिला

बंगळुरू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरूच्या बन्नेरघट्टामध्ये सिमेन्ट काँक्रिट मिक्सर घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचे संतुलन बिघडले आणि तो शेजारून जात असलेल्या एका कारवर उलटला. हा अपघात इतका भीषण होता की ट्रक उलटल्याने कारमध्ये बसलेल्या माय-लेकीचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी महिला तिच्या मुलीला शाळेत सोडायला चालली होती. पोलिसांनी ट्रक मालकाची ओळख पटवली आहे. पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहे.

मुलगी समता आणि गायत्री कुमार
मुलगी समता आणि गायत्री कुमार

कारमध्ये अडकलेले मृतदेह काढण्यासाठी 4 क्रेन बोलवावे लागले

पोलिसांनुसार 47 वर्षीय गायत्री कुमार आपली 16 वर्षीय मुलगी समता कुमारला शाळेत घेऊन चालल्या होत्या. अपघातानंतर लोकांनी पोलिसांना माहिती दिली. माय-लेकीचे मृतदेह कारमध्ये अडकले होते. ते काढण्यासाठी चार मोबाईल क्रेन आणि एक अर्थ मूव्हिंग व्हेईकल बोलवावे लागले.

पोलिस म्हणाले की, बेल्लारीच्या मृत गायत्री या पती सुनिल कुमार आणि दोन मुलांसह बंगळुरूतील एका अपार्टमेन्टमध्ये राहत होत्या.

रोज वडिलांसह शाळेत जायची समता

16 वर्षांच्या समताला रोज तिचे वडीलच शाळेत सोडायला जायचे. मात्र बुधारी मीटिंगमुळे ते लवकर निघून गेले. यामुळे गायत्री आपल्या मुलीला सोडायला शाळेत जात होत्या. सुनिल कुमार जेव्हा अपघातस्थळी पोहोचले तेव्हा ते मृतदेह बघून रडायला लागले. सुनिल म्हणाले की त्यांना एक 10 महिन्यांचा मुलगा आहे. त्याला ते मावशीच्या घरी सोडून आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...