आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरुमध्ये दुचाकी टॅक्सी चालकांना ऑटो चालकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. बंगळुरु सीटी पोलिसांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात एक ऑटो चालक हा रॅपिडो चालकाचे हेल्मेट तोडताना आणि शिविगाळही करताना दिसून येत आहे.
ऑटोवाला म्हणाला - आम्हाला प्रवासी मिळत नाहीत
ऑटो चालक म्हणतो की, रॅपिडोचा अवैध धंदा सुरू आहे. हे दुसऱ्या देशातील लोक येथे येऊन राजाप्रमाणे फिरतात. दुचाकी टॅक्सीमुळे ऑटोवाल्यांना प्रवासी मिळत नाहीत. ऑटो चालकांना धंदा बिघडला आहे.
दुचाकी चालक हा पूर्वोत्तर राज्यातील रहिवासी
दुचाकी चालक हा पूर्वोत्तर राज्यातील रहिवासी असून तो शहरात रॅपिडोसोबत काम करतो. 5 मार्चला ही घटना घडली असून पोलिसांनी 7 मार्चला गुन्हा नोंदवला आहे.
पोलिस म्हणाले - आरोपींचा तपास सुरू
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा व्हिडिओ बंगळुरुमधील इंदिरा नगर मेट्रो स्टेशन जवळचा असून आरोपींचा शोध सुरू आहे.
बंगळुरुमध्ये ऑटो रिक्षा चालक सुरू करणार 'नम्मा यात्री कॅब'
ओला, उबेर सारख्या सर्विसेसने अधिक शुल्क आकारल्याच्या वारंवार तक्रारी येत होत्या. त्यानंतर कर्नाटक परिवहन मंडळाने अशा काही प्रमुख अॅप्सची बंगळुरूमधली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकातील ओला, उबेर आणि रॅपिडोवर बंदी घातल्यानंतर बेंगळुरूमधील ऑटोरिक्षा चालक स्वतःचे अॅप लॉन्च करणार आहेत. ऑटो ड्रायव्हरने 'नम्मा यात्री' नावाचे कॅब सर्व्हिस अॅप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे अॅप कन्नड राज्योत्सवाच्या दिवशी 1 नोव्हेंबरपासून काम करण्यास सुरुवात करेल. इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांचे समर्थन असलेल्या बेकन फाऊंडेशनच्या भागीदारीत हे लॉन्च केले जाईल. येथे वाचा संपुर्ण बातमी.
दिल्लीत बंदी, मग गुरुग्राममध्ये का चालते बाईक टॅक्सी
तुम्हाला तुमच्याच शहरात 7-8 किलोमीटर अंतरावर कुठेतरी जायचे असेल. पण कॅबचे भाडे 200 ते 250 रुपयांपर्यंत असेल… परंतु जर तुम्हाला कमी किंमतीत लवकर समान अंतर कव्हर करायचे असेल तर? त्यासाठी पर्याय आहे, बाईक टॅक्सी!
कॅबच्या अर्ध्याहून कमी भाड्यात… व्यस्त रहदारीमध्ये चांगल्या गतीने पोहोचणे… ही दोन वैशिष्ट्ये आहेत ज्याने बाईक टॅक्सी भारतात लोकप्रिय केली आहे. परंतु लोकप्रियतेत वाढ झाल्यामुळे बाईक टॅक्सी ऑपरेशनवरील गोंधळ देखील वेगाने वाढला आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.