आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफोर्ब्सने (Forbes) नुकतीच जगभरातील श्रीमंतांची यादी जारी केली आहे. 2023 च्या अब्जाधीशांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी 9 व्या क्रमांकावर आहेत. तर भारतात ते अव्वल क्रमांकावर आहेत. याच यादीत अवघ्या 36 वर्षांच्या एका तरुणाचाही समावेश आहे. बंगळुरूत राहणाऱ्या निखिल कामथ नामक हा तरूण फोर्ब्सच्या यादीत सहभागी होणारा सर्वात कमी वयाचा अब्जाधीश ठरला आहे.
कोण आहेत निखिल कामथ?
ब्रोकरेज फर्म Zerodha चे सह-संस्थापक निखिल कामथ फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळणारे सर्वात कमी वयाचे अब्जाधीश ठरलेत. त्यांचे एकूण नेटवर्थ 1.1 अब्ज डॉलर्सचे आहे. ते जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 2405 व्या क्रमांकावर आहेत.
कधीकाळी 250 रुपये रोज कमवत होते निखिल
यंगेस्ट इंडियन बिलिनेअर निखिल कामथ यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षापासून नोकरी करण्यास सुरुवात केली. प्रारंभी त्यांनी एका कॉल सेंटरमध्ये काम केले. तिथे त्यांना जवळपास 250 रोज म्हणजे दरमहा 8 हजार रुपये वेतन मिळत होते.
शेअर ट्रेडिंने पालटले नशीब
काही दिवस नोकरी केल्यानंतर निखिल कामथ यांनी शेअर मार्केट ट्रेडिंगवर काम सुरू केले. सुरुवातीला त्यांनी शेअर ट्रेडिंगचे काम गांभिर्याने घेतले नाही. पण त्यानंतर त्यांनी मार्केटची नस अचूक ओळखून त्यावर लक्ष केंद्रीत केले. यामुळे शेअर ट्रेडिंगच्या कामात त्यांची वेगवान प्रगती झाली.
वडिलांच्या पैशांची गुंतवणूक
निखिल कामथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडिलांनी त्यांना आपल्या बचतीचे काही पैसे मॅनेज करण्यासाठी दिले होते. हे पैसे त्यांनी शेअर मार्केटमध्ये गंतवले. यामुळे वडिलांच्या पैशांची वाढ करण्याची जबाबदारी निखिल यांच्यावर पडली. काही वर्षे गुंतवणूक केल्यानंतर त्यांना शेअर बाजाराचा चांगला अभ्यास झाला. यामुळे त्यांनी हळू-हळू त्यांनी नोकरी सोडली आणि आपला संपूर्ण वेळ शेअर ट्रेडिंगच्या कामाला देण्यास सुरुवात केली.
2010 मध्ये भावासोबत सुरू केली Zerodha कंपनी
निखिल यांनी आपला भाऊ नितीन कामथ यांच्या मदतीने 2010 मध्ये एक कंपनी सुरू केली. तिचे नाव त्यांनी Zerodha ठेवले. नोकरी सोडल्यानंतर निखिल यांनी याच कंपनीवर फोकस केले. त्यांच्या कष्टामुळे अवघ्या 12 वर्षांतच त्यांनी या कंपनीची भरभराट केली. सध्या या कंपनीकडे 1 कोटींहून अधिक कस्टमर्स आहेत. यामुळे ही कंपनी देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज कंपनी ठरली आहे. निखिल कामथ यांचे व्हेंचर कॅपिटल फंड व इनक्यूबेटर, ज्याला रेनमॅटर म्हणतात, आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देणाऱ्या फिनटेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.