आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरूच्या लिंगधीरनहल्लीच्या आगारात उभ्या बसला शुक्रवारी पहाटे अचानक आग लागली. त्यात बसमध्येच झोपलेल्या एका कंडक्टरचा जळून मृत्यू झाला. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. यासंबंधीच्या वृत्तानुसार, आग लागली तेव्हा 45 वर्षीय मुथैया स्वामी बेशुद्धावस्थेत होते. यामुळे त्यांना बसबाहेर पडता आले नाही. त्यांचा बसमध्येच अक्षरशः कोळसा झाला.
बस पेटली तेव्हा बदरहल्ली पोलिस स्टेशनचे गस्ती पथक तेथून जात होते. त्यांनी पेटलेली बस पाहून फायर ब्रिगेडला फोन केला. तसेच अपघाताचा तपास सुरू केला.
ड्रायव्हर आगाराच्या इमारतीत झोपल्याने वाचला
यासंबंधीच्या वृत्तानुसार, मुथैया जो BMTC मध्ये नोकरीला होते. काही वेळापूर्वीच डेपो 31 मॅनेजर म्हणून शिफ्ट झाले होते. ते येथे कंडक्टर होते. रात्री 10.30 च्या सुमारास शिफ्ट संपल्यानंतर ते ड्रायव्हरसोबत लिंगधीरनहल्ली बस स्थानकावर पोहोचले. ड्रायव्हर प्रकाश डेपोच्या बिल्डिंगमधील शेल्टरमध्ये झोपण्यास गेले. तर मुथैया यांनी बसमध्येच झोपण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी मुथैय्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरू केला आहे.
2017 पासून BMTC सेवेत होती बस
जी बस भस्मसात झाली ती टाटा कंपनीकडून 2016 मध्ये खरेदी करण्यात आली होती. बस 2016 बीएस-4 मॉडेलची होती. तिचा 2017 मध्ये BMTC च्या ताफ्यात समावेश झाला होता. आग लागण्यापूर्वी तिने जवळपास 3.75 लाख किमी अंतर कापले होते. या घटनेमुळे ड्रायव्हरला तीव्र मानसिक धक्का बसला आहे. पोलिस आता या घटनेसाठी जबाबदार बाबींचा शोध घेत आहेत.
बसने पेट घेतल्यासंबंधीच्या खालील बातम्या वाचा...
शिवशाही बस पेटली:शिवशाही बसने अचानक रस्त्यावर पेट घेतला; 42 प्रवासी सुखरूप
यवतमाळ ते पुणे प्रवास करत असलेली राज्य परिवहन विभागाची शिवशाही बस मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील येरवडा परिसरात आली असताना बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. त्यानंतर सदर रस्त्यावरील वाहतूक पाेलिसांनी थांबवत अग्निशमन दलाच्या गाडीस घटनास्थळी बाेलवल्यानंतर जवनांनी तत्काळ आग आटाेक्यात आणली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...
नाशिक-पुणे महामार्गावर शिवशाही बस जळून खाक:सलग तिसऱ्या दिवशी एसटीच्या तिसऱ्या बसला आग,43 प्रवाशांचा जीव वाचला
नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नरजवळ बुधवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास धावत्या शिवशाही बसला आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखून सर्व ४३ प्रवाशांना सुखरूप उतरवले. एसटीच्या बसेसना आग लागल्याची बुधवारची ही ३१ ऑक्टोबरपासून सलग तिसरी घटना आहे. पिंपरी-चिंचवड आगाराची बस (एमएच ०६, बीडब्ल्यू ०६४०) नाशिक येथून सकाळी ७ च्या सुमारास पुण्याकडे रवाना झाली. माळवाडी शिवारात बस आल्यानंतर गती आपोआप मंदावल्याचे चालक अमीत वासुदेव खेडेकर (४१) यांच्या लक्षात आले. त्यांनी बस रस्त्याच्या डाव्या बाजूला घेतली. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.