आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bangalore CCTV Video Footage; Mother Throws Daughter From Fourth Floor | Marathi News

माता न तू वैरिणी:बंगळुरूमध्ये आईने 4 वर्षांच्या मुलीला चौथ्या मजल्यावरून फेकले, जागेवरच चिमुकलीचा मृत्यू

बंगळुरू6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरूमध्ये एका महिलेने आपल्या 4 वर्षांच्या मुलीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकले. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला आणि यानंतर महिला स्वत: बाल्कनीच्या रेलिंगवर बसली. मुलीला फेकून देऊन आपण रेलिंगवरून उडी मारून आत्महत्या करणार असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. सुषमा भारद्वाज असे या महिलेचे नाव असून, दृती बालकृष्णन असे मुलीचे नाव आहे.

ही घटना सेंट्रल बंगळुरूच्या संपनगिरामानगर येथील अद्वैत आश्रय अपार्टमेंटमधील आहे. ही संपूर्ण घटना अपार्टमेंटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिला मुलीला कडेवर घेऊन बाल्कनीत आली आणि काही वेळाने तिला खाली फेकून दिले. यानंतर तिने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला आणि स्वत: उडी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकांनी तीला वाचवले.

करिअरमधील अडचणीमुळे असे पाऊल उचलले
ही महिला व्यवसायाने डेंटिस्ट आहे, तर तिचा पती किरण बालकृष्ण सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मुलगी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आणि श्रवणशक्ती कमी असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे महिला चिंतेत होती. ती तिच्या करिअरमध्ये चांगली कामगिरी करू शकत नव्हती आणि त्यासाठी मुलीला दोष देत असे. त्यामुळे तिने मुलीच्या हत्येचे पाऊल उचलले.

खुनाच्या आरोपाखाली महिलेला अटक
पोलिसांनी सांगितले की, पतीने महिलेवर गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर महिलेला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सर्व बाजूंचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेच्या मानसिक आरोग्याचीही चाचणी केली जाणार आहे. यापूर्वी एकदा सुषमाने आपल्या मुलीला रेल्वे स्टेशनवर सोडले होते. ही बाब सुषमाच्या पतीला कळताच त्यांनी स्टेशनवर जाऊन मुलीला शोधून आणले होते.

बातम्या आणखी आहेत...