आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bangalore Police Harassment Of Couple; Couple Late Night Hang Out | Bengaluru | Karnataka News

बंगळुरुत रात्री 11 नंतर बाहेर फिरणे महागात:पोलिसांनी ठोठावला 3 हजारांचा दंड; दाम्पत्याने सोशल मीडियावर मांडले गाऱ्हाणे

बंगळुरू4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांनी दाम्पत्याला सांगितले की, त्यांना रात्री 11 नंतर रस्त्यावर फिरण्याची परवानगी नाही. 

रात्री 11 नंतर घरी परतणाऱ्या एका जोडप्याला बंगळुरु पोलिसांनी तब्बल 3 हजारांचा दंड ठोठावल्याची विचित्र घटना उजेडात आली आहे. या जोडप्याने आपल्यावर गुदरलेला प्रसंग सोशल मीडियात मांडला. तसेच बंगळुरु शहर पोलिस आयुक्तांकडे मदतही मागितली. 'रात्री 11 नंतर घराजवळ चालणे कायद्याचे उल्लंघन असल्याचे सांगत पोलिसांनी आम्हाला दंड भरण्यासाठी मजबूर केले,' असे ते म्हणालेत.

कार्तिक पत्रीने सलग 15 ट्विटद्वारे आपली कहाणी शेयर केली. ते म्हणाले - मी एक दुखःद घटना शेयर करत आहे. हा प्रसंग मी व माझ्या पत्नीसोबत घडला. गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास आम्ही एका मित्राचा वाढदिवस साजरा करून घरी परतत होतो. आम्ही आमच्या घरापासून काही मीटर अंतरावर होतो. तेव्हा एक गस्ती वाहन आमच्याजवळ येवून थांबले. त्यात पोलिसांच्या गणवेषात बसलेल्या 2 जणांनी आम्हाला ओळखपत्र दाखवण्याची सूचना केली. त्यावर आम्ही आमचे आधार कार्ड दाखवले. त्यानंतर त्यांनी आमचे फोन जप्त केले. आमची वैयक्तिक माहिती घेतली.

पोलिस म्हणाले - रात्री 11 नंतर रस्त्यावर फिरण्याची परवानगी नाही

पात्री म्हणाले - आम्ही नम्रपणे पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी चालान बूकवर आमचे नाव व आधार क्रमांक नोट करणे सुरू केले. आम्ही त्यांना आम्हाला दंड का ठोठावला जात आहे? असा प्रश्न केला. त्यावर एका पोलिसाने आम्हाला रात्री 11 नंतर रस्त्यावर फिरण्याची परवानगी नसल्याचे सांगितले.

पात्री म्हणाले - माफी मागितल्यावरही मानले नाही

पात्री म्हणाले - असा एखादा नियम असल्याचे आम्हाला माहिती नव्हते. आम्ही त्यावर हरकतही घेतली. पण रात्र फार झाल्यामुळे व आमचे फोनही जप्त केल्यामुळे आम्ही हे प्रकरण फार न तानण्याचा निर्णय घेतला. आम्ही पोलिसांची माफी मागून जावून देण्याची मागणी केली. पण त्यांनी आम्हाला सोडण्यास नकार दिला. तसेच आमच्याकडून 3 हजारांचा दंडही वसूल केला.

दोन्ही पोलिस निलंबित

पात्री म्हणाले - विनंती करूनही पोलिसांनी आम्हाला जावू दिले नाही. आम्हाला अटक करण्याची व गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. माझ्या पत्नीची रडून स्थिती वाईट झाली. त्यानंतर एक पोलिस मला घेवून दूर गेला. तसेच पुढील त्रास टाळण्यसााठी पैसे देण्याची सूचना केली. त्यावर मी 3 हजार रुपये देण्यास तयार झालो.

पोलिस कर्मचारी तयार झाला. त्याने तत्काळ ऑनलाइन पेमेंट करण्याचे सांगितले. त्यानंतर इशारा देवून आम्हाला सोडण्यात आले. दुसरीकडे, पोलिस उपायुक्त अनूप ए शेट्टी यांनी या प्रकरणी कठोर कारवाईचे आश्वासन दिले. सध्या या प्कररणी सम्पीगेहल्ली पोलिस ठाण्यातील एका कॉन्स्टेबलसह हेड कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. तसेच अशा घटनांना सामोरे जाणाऱ्या नागरिकांना पोलिसांशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...