आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bangalore Is The Best City To Live In; Chandigarh Top In Education, Aurangabad Top In Health

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईझ ऑफ लिव्हिंग इंडेक्स:वास्तव्यासाठी बंगळुरू सर्वात चांगले शहर; शिक्षणात चंदीगड, आरोग्यात औरंगाबाद टॉप

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रँकिंगसाठी १११ शहरांतील ३२ लाख लोकांची मते घेतली

केंद्र सरकारने गुरुवारी ईझ ऑफ लिव्हिंगच्या हिशेबाने शहरांचे रँकिंग जारी केले. १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांत बंगळुरू आणि पुणे ही वास्तव्यासाठी सर्वात चांगली शहरे मानण्यात आली. श्रीनगर व धनबाद सर्वात तळाशी राहिले. ईझ ऑफ लिव्हिंग इंडेक्स तयार करण्यासाठी १११ शहरांतील ३२ लाख लोकांची मते घेण्यात आली. शहरांच्या आकलनासाठी २१ मापदंड ठरवले होते, त्यात शिक्षण, आरोग्य, सुरक्षा व्यवस्था, मनोरंजन आणि आर्थिक संधी हे प्रमुख आहेत. अशाच प्रकारे महापालिकांच्या कामगिरीच्या आधारावर शहरांचे रँकिंग करण्यात आले. त्यात इंदूर पहिल्या, सुरत दुसऱ्या व भोपाळ तिसऱ्या स्थानी राहिले. त्यांचे मापदंड सेवा, आर्थिक स्थिती, प्रशासकीय व्यवस्था हे आहेत.

ईझ ऑफ लिव्हिंगमध्ये औरंगाबाद देशात ३४ व्या, नागपूर २५ व्या स्थानावर
जगण्याचा दर्जा (क्वालिटी अाॅफ लाइफ) श्रेणीत अाैरंगाबादने देशभरातील सर्वाेत्तम शंभर शहरांत १३ वे स्थान तर ईझ ऑफ लिव्हिंगमध्ये ३४ वा क्रमांक मिळवला. राहणीमान सुलभता निर्देशांकात नागपूर देशात २५ व्या क्रमांकावर आहे.

बातम्या आणखी आहेत...