आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेला मंदिरातून फरफटत बाहेर काढले VIDEO:लाथ-बुक्क्यांनी केली मारहाण; पती मानून देवाशेजारी बसायचे होते महिलेला

बंगळुरूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बेंगळुरूमधील एका मंदिरातून एका महिलेला ओढून नेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये महिलेला लाथ मारून, थप्पड मारून मंदिराबाहेर खेचले जात असल्याचे दिसत आहे. मंदिराच्या पुजाऱ्याने पोलिसांना सांगितले की, ती महिला गर्भगृहात आपल्या शेजारी बसण्याचा आग्रह करत होती आणि देवतेला तिचा पती म्हणत होती.

महिलेवर मारहाणीची ही घटना मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
महिलेवर मारहाणीची ही घटना मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे जाणून घेऊया
व्हायरल होत असलेल्या या सव्वा मिनिटांच्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आधी खिडकीजवळ उभ्या असलेल्या महिलेशी बोलतो. नंतर तिचे केस ओढून तिला मंदिराच्या गेटपर्यंत घेऊन जातो, जेव्हा ती स्त्री गेटजवळून उठते आणि आत येते, तेव्हा तो तिला पुन्हा चापटेने मारहाण करतो. तिला खाली लोटतो आणि ओढत तिला बाहेर नेतो. तिला मंदिराबाहेर नेऊन पुन्हा मारहाण करतो. असे असतानाही ती उठून मंदिरात जाण्याचा प्रयत्न करते. तेव्हा गेटजवळ उभा असलेला पुजारी तिला अडवतो. तर दुसरा व्यक्ती तिला काठीने मारहाण करण्यासाठी तिचा पाठलाग करतो.

त्या महिलेला मंदिरातून हाकलून दिले, तरीही ती पुन्हा पुन्हा आत जाण्याचा आग्रह करत होती.
त्या महिलेला मंदिरातून हाकलून दिले, तरीही ती पुन्हा पुन्हा आत जाण्याचा आग्रह करत होती.

ही घटना 21 डिसेंबरची, व्हिडिओ व्हायरल पोलिसांची कारवाई
मंदिरात महिलेसोबत मारहाणीची घटना 21 डिसेंबरची असल्याची समोर आले आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, हेमावती असे त्या पीडित महिलेचे नाव आहे. पीडित महिलेने अमृतहल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की, अमृतहल्ली परिसरातील लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरातील धर्मदर्शी मुनीकृष्ण यांनी तिच्यावर हल्ला केला होता. पोलिसांनी मुनीकृष्णाविरुद्ध भादंवि कलम 354 अन्वये गुन्हा दाखल केला.

पुजारी म्हणाला- ती महिला तिच्यावर थुंकते
मंदिराचे पुजारी मुनीकृष्ण यांनी पोलिसांना सांगितले की, महिलेने दावा केला की, भगवान व्यंकटेश्वर हे तिचे पती आहेत. त्यांना गर्भगृहात मूर्तीच्या शेजारी बसायचे आहे. जेव्हा तिच्या विनंतीकडे लक्ष दिले गेले नाही. तेव्हा ती पुजाऱ्यावर थुंकली. त्यानंतर पूजाऱ्याने तिला निघून जाण्यास सांगितले. महिलेने मान्य न केल्याने तिला बेदम मारहाण करून बाहेर काढण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...